किमान तापमान : 24.42° से.
कमाल तापमान : 25.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 3.09 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.99° से.
23.29°से. - 28.55°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल23.28°से. - 28.56°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.22°से. - 28.61°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.05°से. - 26.8°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश22.52°से. - 27.89°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल22.33°से. - 26.62°से.
रविवार, 01 डिसेंबर टूटे हुए बादलऔरंगाबाद, [२६ एप्रिल] – राज्यात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तेथील दारू आणि बिअर निर्मिती कंपन्यांच्या पाणीपुरवठ्यात उद्यापासून ५० टक्के आणि १० मेपासून ६० टक्के पाणीकपात करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व न्यायमूर्ती एस. एस. पाटील यांनी आज मंगळवारी प्रशासनाला दिले आहे.
उद्यापासून ही कपात ३० टक्क्यांनी होणार असून १० मे ते १० जून या काळात ६० टक्के असणार आहे. तर सर्वसामान्य उद्योगांची पाणीकपात २५ टक्के इतकी असणार आहे. दुष्काळग्रस्त १३ जिल्हयांसाठी हा निर्णय लागू होणार आहे. या कपातीमुळे शिल्लक राहणारे पाणी पिण्यासाठी वापरण्यात यावे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. याची पुढील सुनावणी १० जून रोजी होणार आहे.
मराठवाड्यामधल्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत असताना मद्यनिर्मितीसाठी पाणी देऊ नये अशी मागणी केली जात होती. तसेच राज्यातील आयपीएलचे सामनेही अन्य राज्यांमध्ये हलविण्याचे आदेश न्यायालयांनी दिले आहेत.
दरम्यान, कोपरगाव येथील संजय काळे यांनी ऍड. सतीश बी. तळेकर यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आज मंगळवारी सुनावणी झाली.