किमान तापमान : 24.29° से.
कमाल तापमान : 24.76° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 44 %
वायू वेग : 4.06 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.76° से.
24.13°से. - 28.21°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल23.88°से. - 28.16°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.85°से. - 28.29°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.36°से. - 26.86°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश23.11°से. - 27.74°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल23.04°से. - 26.29°से.
रविवार, 01 डिसेंबर टूटे हुए बादल=साठा फक्त १७ टक्के=
मुंबई, [२६ एप्रिल] – राज्यात पडलेल्या दुष्काळाने यंदा जलस्थिती अतिशय बिकट बनली असून जलाशयांतील उपयुक्त पाण्याचा साठा फक्त १७ टक्के शिल्लक असल्याचे वास्तव पुढे आले आहे.
मंगळवारी येथे राज्य सरकारतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार मराठवाड्यात केवळ तीन टक्के जलसाठा उरला असून पाण्यासाठी टाहो फोडणार्या ३५८६ गावांसह ५९९३ वाड्यांना ४६४० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आहे.
सरकारी आकडेवारी पाहिल्यास गेल्या वर्षी राज्यात २९ टक्के जलसाठा होता. त्या तुलनेत यंदाचा १७ टक्के साठा पाण्याची भीषण स्थिती दर्शवित आहे. विभागश: पाहिल्यास मराठवाड्यात यंदा ३ टक्के (गत वर्षी ११), कोकण-४४ (४३), नागपूर-२५ (२७), अमरावती-१७ (३०), नाशिक-१५ (३२) आणि पुणे-१८ टक्के (गत वर्षी ३६ टक्के) एवढा जलसाठा शिल्लक आहे.
साडेतीन हजार गावांना टँकरने पाणीपुरवठा
राज्यातील ३५८६ गावे आणि ५९९३ वाड्यांना यंदा २५ एप्रिलपर्यंत ४६४० टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. मागील वर्षी याच सुमारास १४०१ गावे आणि १६६४ वाड्यांना १६८६ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यातआला होता.
रोहयोच्या कामांवर चार लाख मजूर
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात १६ एप्रिलपर्यंत ३०,४४७ कामे सुरू असून या कामांवर तीन लाख ९५ हजार २०८ मजुरांची उपस्थिती आहे. राज्यात ४ लाख १४ हजार ६२४ कामे शेल्फवर असून त्या कामांची मजूर क्षमता १२८८.२६ लाख एवढी आहे.
३६७ चारा छावण्या
याशिवाय राज्यात बीड, लातूर, उस्मानाबाद आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून २१ एप्रिल अखेरपर्यंत बीड २७१, उस्मानाबाद ८८, अहमदनगर ५, लातूर ३ याप्रमाणे एकूण ३६७ चारा छावण्या सुरू आहेत. लहान-मोठी अशी एकूण ३ लाख ८३ हजार १९३ जनावरे या छावण्यांचा लाभ घेत असल्याचेही शासनातर्फे सांगण्यात आले.