|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:24 | सूर्यास्त : 18:37
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.11° C

कमाल तापमान : 27.99° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 83 %

वायू वेग : 1.04 Mps

स्थळ : Mumbai, IN

27.99° C

Weather Forecast for
Friday, 29 Mar

26.31°C - 28.81°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 30 Mar

26.38°C - 28.98°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 31 Mar

26.21°C - 29.45°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 01 Apr

26.14°C - 28.72°C

scattered clouds
Weather Forecast for
Tuesday, 02 Apr

25.54°C - 28.44°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 03 Apr

25.16°C - 28.57°C

sky is clear
Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » राज्य आपत्ती व्यवस्थापन आराखड्यास मंजुरी

राज्य आपत्ती व्यवस्थापन आराखड्यास मंजुरी

=स्वयंचलित हवामान केंद्राचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन : मुख्यमंत्री=
FADNAVIS_DEVENDRAमुंबई, [२७ एप्रिल] – बिगर मोसमी पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि राज्यावर वित्तीय ताण वाढतो. त्यामुळे शेतकर्‍यांना हवामानाचा अचूक अंदाज दिला तर पिकांचे नुकसान थांबू शकते. त्यासाठी कर्नाटक राज्याच्या धर्तीवर अचूक हवामान अंदाज देणारे स्वयंचलित हवामान केंद्र (ऑटोमॅटिक व्हेदर स्टेशन) उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी कृषी, मदत व पुनवर्सन मंत्री एकनाथ खडसे, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे, आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, सचिव मिलिंद म्हैसकर, जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख, नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डवले, वॉटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्टचे सहसंस्थापक क्रिस्टोनो लोबो, महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य सर्वश्री सुधीर ठाकरे, रवी सिन्हा, अतुल देऊळगावकर, यशवंत ठाकूर, श्रीमती जॅकलीन जोसेफ, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संचालक रवी साठे, नवी दिल्लीचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य कमल किशोर, यू. एन. डी. पी. चे संचालक जॉको सिलर्स, जागतिक बँकेचे संचालक ओनो रुई, एन. सी. आर. एम. पी. जागतिक बँकेचे सौरभ दाणी आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, दुष्काळ आणि जागतिक तापमान यांचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात वाढले असून योग्य वेळी त्यावर उपाययोजना केल्या नाही तर त्याचे परिणाम अधिक प्रमाणात दिसून येतात. त्यासाठी एरिया ट्रिटमेंट आणि जलसंधारणाचे काम मोठ्या प्रमाणात केले तर सरासरी ५० टक्के पाऊस झाला तरी त्यावर मात करू शकतो. स्थानिक पातळीवर पाणी व्यवस्थापनासंदर्भात कायदा तयार करुन त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी पाणी व्यवस्थापनावर काम करणार्‍या संस्थांनी यामध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहनही फडणवीस यांनी यावेळी केले.
यावेळी खडसे म्हणाले की, दुष्काळ निवारण व जागतिक तापमानवाढीच्या पार्श्‍वभूमीवर शाश्‍वत विकास करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील भौगोलिक रचना पाहता मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात गेल्या २-३ वर्षांपासून दुष्काळ आहे. त्यावर शासन उपाययोजना करते आहे. मात्र कायमस्वरुपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी जागतिक तापमानवाढ व त्याचे कृषी क्षेत्रावर होणारे दुष्परिणाम याबाबत त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा अभ्यास गट नेमून कायमस्वरुपी उपाययोजनेबाबत धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे.
कोरडवाहू शेती अभियान, पीक पद्धतीत बदल यावर अधिक भर देऊन शेतकर्‍याला आधार दिला पाहिजे. केंद्र शासनाने प्रधानमंत्री विमा योजनेची अंमलबजावणी सुरू केली असून यामध्ये शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाईची मदत मिळणार आहे. तसेच शालेय अभ्यासक्रमामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचा समावेश करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले तर अधिक जागरूकता वाढेल असे सांगून खडसे यांनी या बैठकीला उपस्थित तज्ज्ञांच्या मार्गदर्शन आणि सूचनाबद्दल सर्वांचे आभार मानले.
दरम्यान, या बैठकीत महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. आराखड्यास मान्यता देऊन यामध्ये महाराष्ट्र आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रमास मुदतवाढ आणि कायमस्वरुपी पद निर्मिती करणे, आपदग्रस्तांना द्यावयाच्या किमान सहाय्याबाबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे निकष लागू करणे, महाराष्ट्र शालेय सुरक्षा कार्यक्रम राबविणे, अद्ययावत राज्य आपत्कालीन कार्य केंद्र आणि जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र यांची उभारणी, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रभागामार्फत करण्यात आलेल्या कार्याचा आढावा, शोध व बचाव साहित्य खरेदीस कार्योत्तर मान्यता आणि ही खरेदी नवीन खरेदी धोरणानुसार व्हावी, महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातील सल्लागारांची फेरनियुक्ती याबाबत सविस्तर चर्चा करुन सर्व संबंधित विभागाकडून प्राप्त झालेले अभिप्राय आणि लोकांकडून प्राप्त झालेल्या सूचना विचारात घेऊन या आराखड्यास मान्यता देण्यात आली.
* प्रत्येक जिल्ह्यातील ५० शिक्षकांना आपत्ती व्यवस्थापनाचे मास्टर ट्रेनर्सचे प्रशिक्षण व नंतर त्यांच्यामार्फत इतर शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देणे.
* विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी या पदास कायम स्वरुपी मान्यता देणे.

Posted by : | on : 28 Apr 2016
Filed under : ठळक बातम्या, महाराष्ट्र
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g