किमान तापमान : 25.86° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 36 %
वायू वेग : 1.98 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
24°से. - 28.53°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल23.61°से. - 28.82°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.07°से. - 28.75°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.01°से. - 28.78°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.12°से. - 27.87°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल22.59°से. - 28.12°से.
रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादलनवी दिल्ली, [२७ एप्रिल] – इंग्रजांना सळो की पळो करून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे शहीद भगतसिंग यांना दिल्ली विद्यापीठातील अभ्यासक्रमाच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात चक्क दहशतवादी संबोधण्यात आले. अनावधानाने ही चूक झाली असल्याचा खुलासा विद्यापीठ प्रशासनाने केला असला, तरी इतिहासकार आणि समाजाच्या सर्वच घटकांनी विद्यापीठाच्या या भोंगळ कारभारावर प्रखर टीका केली आहे.
देशावर इंग्रजांचे राज्य असताना भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या सारख्या क्रांतिकारांनी ब्रिटिशांना ठार केले होते. त्यांच्या या राष्ट्रवादी कृत्याचा उल्लेख दिल्ली विद्यापीठ प्रशासनाने ‘भारताचा स्वातंत्र संघर्ष’ असे नाव असलेल्या इतिहासाच्या पुस्तकात दहशतवादी अशा शब्दात केला आहे. या पुस्तकातील विसाव्या प्रकरणात शहीद भगतसिंग यांना क्रांतिकारक दहशतवादी, असे म्हटले आहे. भगतसिंग यांच्यासह चंद्रशेखर आझाद, सूर्या सेन यांनाही क्रांतिकारक दहशतवादी संबोधण्यात आले आहे.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त प्रसारित केल्यानंतर विद्यापीठ प्रशासन जागे झाले. ही घटना समोर आल्यानंतर अनेक इतिहासकार व लेखकांनी इतिहासातून हा आक्षेपार्ह उल्लेख तातडीने दूर करण्याचे आवाहन केले. विद्यापीठानेही तातडीने आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती सूत्राने दिली.
दरम्यान, जदयूचे सरचिटणीस के. सी. त्यागी यांनी या प्रकाराचा निषेध करून, हा मुद्दा राज्यसभेत उपस्थित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. भगतसिंग यांच्या नातेवाईकांनीही या घटनेचा निषेध केला आहे. भगतसिंग यांचे लहान भाऊ कुलबीर सिंग यांनी मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांना पत्र लिहून या प्रकाराकडे लक्ष वेधले आहे.