किमान तापमान : 24.42° से.
कमाल तापमान : 25.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 3.09 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.99° से.
23.29°से. - 28.55°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल23.28°से. - 28.56°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.22°से. - 28.61°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.05°से. - 26.8°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश22.52°से. - 27.89°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल22.33°से. - 26.62°से.
रविवार, 01 डिसेंबर टूटे हुए बादल=ममतांचा कॉंगे्रसवर हल्ला=
श्रीरामपूर, [२७ एप्रिल] – शारदा चिटफंड घोटाळ्यावरून पश्चिम बंगाल विधानसभेत गोंधळ घालणारा कॉंगे्रस पक्ष संपुआ सरकारच्या काळात ‘टू-जी’ घोटाळ्यासह घडलेल्या अन्य घोटाळ्यांवर का बोलत नाही, असा सवाल करून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज बुधवारी या पक्षावर जोरदार हल्ला चढविला.
कॉंगे्रस पक्ष भ्रष्टाचारावर मोठमोठ्या गप्पा मारत आहे. शारदा घोटाळ्यावरून माझ्या सरकारविरोधात बोलत आहे. पण, संपुआ सरकारच्या काळात घडलेल्या हजारो-लाखो कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत शब्दही काढत नाही. घोटाळ्यांमध्ये आकंठ बुडालेल्या कॉंग्रेस पक्षाला खरे तर बोलण्याचा अधिकारच नाही, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी हुगळी जिल्ह्यातील निवडणूक सभेला संबोधित करताना केली.
माझ्या सत्तेच्या पाच वर्षांच्या काळात जेव्हा कॉंगे्रसची गरज होती, तेव्हा या पक्षाचा एकही नेता समोर आला नाही. आता निवडणुका आल्या म्हणून हा पक्ष आता सर्वत्र दिसत आहे. हा पक्ष म्हणजे स्थलांतरित पक्ष्यांप्रमाणे आहे. निवडणुका आल्या की ते लोकांना दिसत असतात, असा टोलाही त्यांनी हाणला.
राज्यात कॉंगे्रस आणि माकपा युतीला २०० जागा मिळतील, हा माकपाच्या एका नेत्याचा दावा फेटाळून लावताना या युतीला २० पेक्षा जास्त जागा मिळणार नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला. ममतांनी भाजपावरही टीका केली. लोकसभा निवडणुकीत या पक्षाला दोन जागा मिळूनही त्यांनी राज्यासाठी काहीच केले नाही, असा आरोप त्यांनी केला.