किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल=महाराष्ट्र सदन व अन्य प्रकल्पांतील घोटाळा=
मुंबई, [२७ एप्रिल] – राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या नूतनीकरणात आणि अन्य प्रकल्पांच्या अंमलबजावणीत झालेल्या घोटाळ्यांप्रकरणी दाखल असलेल्या बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्यातील गुन्ह्यांतर्गत विशेष न्यायालयाने आज बुधवारी राष्ट्रवादी कॉंगे्रसचे नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केला आहे. यामुळे पंकज यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या घोटाळ्यांतील आरोपी क्रमांक तीनविरुद्ध (पंकज भुजबळ) आपले न्यायालय अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करीत आहे, असे न्या. पी. आर. भावके यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले. याच घोटाळ्याशी संबंधित दाखल गुन्ह्यांमध्ये यापूर्वी छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही ऑर्थर रोड कारागृहात आहेत. विशेष म्हणजे, या प्रकरणात छगन भुजबळ आरोपी क्रमांक एक आणि समीर भुजबळ आरोपी क्रमांक दोन आहेत.
अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत न्यायालयाने माजी खासदार आणि विद्यमान आमदार पंकज भुजबळ यांच्यासोबतच अन्य काही लोकांविरोधातही अटक वॉरंट जारी केला आहे. दरम्यान, न्यायालयाने छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीतही ११ मे पर्यंत वाढ केली आहे.
तत्पूर्वी, ईडीतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले की, आम्ही आतापर्यंत भुजबळ कुटुंबीयांची १३१.८६ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली असून, ७०८.३० कोटी रुपयांच्या संपत्तीचा शोध घेण्यात येत आहे. या संपत्तीची माहिती मिळाल्यानंतर ती देखील जप्त करण्यात येणार आहे. याशिवाय, आम्ही आतापर्यंत भुजबळ कुटुंबीयांच्या एकूण नऊ संपत्ती, कार्यालये आणि निवासी संकुलांवर दोनवेळा धाडी घातल्या आहेत. या धाडीत मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह कागदपत्रेही हाती लागली आहेत.