किमान तापमान : 25.86° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 36 %
वायू वेग : 1.98 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
24°से. - 28.53°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल23.61°से. - 28.82°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.07°से. - 28.75°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.01°से. - 28.78°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.12°से. - 27.87°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल22.59°से. - 28.12°से.
रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादल=जेएनयूने उगारला कारवाईचा बडगा, कन्हैयाला दहा हजारांचा दंड=
नवी दिल्ली, [२५ एप्रिल] – येथील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) परिसरात संसदेवरील हल्ल्याप्रकरणी अफझल गुरूला फाशी देण्याच्या विरोधात ९ फेब्रुवारी रोजी कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी अखेर विद्यापीठ प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून, विद्यार्थी संघटनेचा प्रमुख कन्हैयाकुमारला दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला, तर उमर खालिदसह तीन विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कालावधीसाठी विद्यापीठातून काढून टाकण्यात आले आहे.
उमर खालिदला एका सत्रासाठी विद्यापीठातून काढून टाकण्यात आले आहे, तर आणखी एक विद्यार्थी नेता अनिर्बान भट्टाचार्यला १५ जुलै आणि मुजीब गट्टूला दोन सत्रांसाठी काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली आहे. जेएनयू प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार अनिर्बानला पुढील पाच वर्षे विद्यापीठात कोणताही अभ्यासक्रम पूर्ण करण्यास मनाई करण्यात आली आहे.
अफझल गुरूच्या फाशीविरुद्ध कार्यक्रम आयोजित केल्यामुळे जेएनयू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचा प्रमुख कन्हैयाकुमार, उमर खालिद व अनिर्बान भट्टाचार्य या तिघांना फेब्रुवारी महिन्यात देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. हे तिघेही सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यांच्या अटकेचे देशभरात तीव्र पडसाद उमटले होते.
प्रशासनाने इतरही काही विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे. बानोज्योत्स्ना लाहिरी व द्रौपदी या दोन माजी विद्यार्थिनींना परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. आशुतोष कुमारची वसतिगृहाची सुविधा वर्षभरासाठी, तर कोमल मोहितेची २१ जुलैपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
९ फेब्रुवारीला परिसरात घडलेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी जेएनयू प्रशासनाने एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती. या कार्यक्रमावर आक्षेप घेणारा अभाविपचा सदस्य सौरभ शर्माला समितीने घटनेच्या दिवशी वाहतुकीत अडथळा आणल्याबद्दल दोषी ठरविले असून, त्याला २० हजार रुपये दंड ठोठावला आहे. अहवालात नाव नसलेला ऐश्वर्या अधिकारी यालाही एवढ्याच रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे, हे विशेष.
नोंदविलेल्या साक्षी, जेएनयूच्या सुरक्षा व्यवस्थेने दिलेल्या व न्यायसहायक चाचणीत योग्य सिद्ध झालेल्या व्हिडीओ क्लिप्स, उपलब्ध दस्तावेज, याआधारे समितीने निष्कर्ष काढला असून, समितीच्या अहवालाच्या आधारे तीन विद्यार्थ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे अशी माहिती विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकार्याने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
कन्हैयाकुमारला दहा हजारांच्या दंडासह एकूण १४ विद्यार्थ्यांना आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. उमर खालिद व अनिर्बान यांना समितीने परिसरात जातीय हिंसाचार घडविणे, परिसरातील जातीय सलोखा बिघडविण्याच्या आरोपाखाली दोषी ठरविले असून, मुजीबला घोषणाबाजी प्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे.