किमान तापमान : 29.06° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 7.9 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.62°से. - 30.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.21°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.54°से. - 31.18°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.65°से. - 30.02°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 29.99°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 29.32°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलनवी दिल्ली, [६ फेब्रुवारी] – दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत सुशासन विरुद्ध अराजक असा प्रमुख मुद्दा असून भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल आणि भाजपाचेच सरकार बनेल, असा विश्वास पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज व्यक्त केला.
११, अशोका रोड या भाजपाच्या मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत जेटली म्हणाले की, दिल्ली हा देशाचा चेहरा असल्यामुळे येथील निवडणुकीकडे सर्व देशाचे लक्ष लागणे स्वाभाविक आहे. दिल्लीत भाजपाच्या किरण बेदी आणि आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल असा लढा नाही, तर सुशासन विरुद्ध अराजक असा लढा आहे. आम्ही सुशासनाचे प्रतीक आहोत, तर आप अराजकाचा चेहरा. त्यांच्या ४९ दिवसांच्या कार्यकाळात दिल्लीतील जनतेने याचा चांगला अनुभव घेतला. केजरीवाल फुटपाथवर चांगले रमतात, सचिवालयात त्यांचा जीव गुदमरतो.
किरण बेदींच्या भाजपाप्रवेशामुळे आणि त्यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केल्यामुळे भाजपाचा फायदा झाला, महिलावर्गात भाजपाबद्दल विश्वास निर्माण झाला, असे जेटली यांनी सांगितले. किरण बेदी यांच्या भाजपाप्रवेशामुळे पक्षात कोणतीही नाराजी नसून समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणार्या लोकांनी याआधी अनेकवेळा भाजपात प्रवेश केला आहे आणि पक्षानेही त्यांना चांगल्या जागा दिल्या आहेत. किरण बेदी यांची प्रतिमा लढाऊ असून त्यांना ४० वर्षाचा प्रशासकीय अनुभव आहे, असे जेटली म्हणाले.
जामा मशिदीच्या इमामाने आम आदमी पार्टीच्या समर्थनार्थ काढलेल्या फतव्याकडे लक्ष वेधले असता जेटली म्हणाले की, निवडणुकीच्या काळात असे फतवे याआधीही अनेकवेळा काढण्यात आले आहेत. गुजरात निवडणुकीतही असे फतवे काढले गेले होते. त्यामुळे फतव्यांच्या विरोधात असणार्यांनी जास्तीतजास्त मतदान करणे हाच यावर पर्याय आहे.
धार्मिक सहिष्णूता ही कोणी भारतीयांना शिकवण्याची गरज नाही, ती आमच्या रक्तातच आहे, असे एका प्रश्नावर जेटली म्हणाले. सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे महागाई नियंत्रणात आहे. मोदी सरकारने सत्तेवर आल्यापासून अनेक कल्याणकारी निर्णय घेतले, या काळात एकही आर्थिक घोटाळा झाला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावेळी भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, दिल्ली प्रदेश भाजपाचे अध्यक्ष सतीश उपाध्याय, प्रदेश भाजपाचे प्रभारी प्रभात झा, खा. मनोज तिवारी उपस्थित होते.