किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 23.32° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादल=बिहारमधील सत्तासंघर्षाला नवे वळण, जीतन राम मांझी यांची हकालपट्टी=
पाटणा, [७ फेब्रुवारी] – गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बिहारमधील सत्तासंघर्षाला आज शनिवारी वेगळेच वळण मिळाले. मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानसभा विसर्जित करण्याची शिफारस केली असतानाच, जदयुने मात्र मांझी यांचीच मुख्यमंत्रिपदावरून तडकाफडकी हकालपट्टी केली. यानंतर झालेल्या जदयु विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नवे नेते अर्थातच बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून पक्षाचे वरिष्ठ नेते नितीशकुमार यांची एकमताने निवड करण्यात आली.
लोकशाहीची अक्षरश: खिल्ली उडविणारा हा राजकीय तमाशा बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. आज शनिवारी चक्क मुख्यमंत्र्यांनाच बाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. शनिवारी सकाळपासूनच पाटण्यात राजकीय घडामोडींना वेग आला होता. शुक्रवारी मांझी यांनी नितीशकुमारांच्या बैठकीला अनधिकृत ठरवून स्वत: विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली होती. त्यानंतर मांझी यांनी शनिवारी सकाळी नितीशकुमारांचे निवासस्थान गाठले. तोडगा काढण्याचे सर्वच प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर दुपारी मांझी यांनी मंत्रिमंडळाची आपात बैठक बोलावली आणि विधानसभा विसर्जित करण्याची शिफारस राज्यपालांकडे केली. या शिफारशीला केवळ सात मंत्र्यांनीच पाठिंबा दिला, तर २१ मंत्र्यांनी विरोध केला. दोन मंत्र्यांमध्ये या मुद्यावरून बैठकीत शाब्दिक चकमकही झडली.
या घडामोडीनंतर लगेच नितीशकुमार यांनी पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली. यात जदयुचे १११ पैकी ९७ आमदार सहभागी होते. यात ४१ पैकी ३७ मंत्र्यांचाही समावेश होता. बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नवे नेते म्हणून नितीशकुमार यांची एकमताने निवड करण्यात आली. मांझी यांना पदाचा राजीनामा देण्याचे आदेशही पक्षाने दिले आहेत. दरम्यान, मांझी यांनी राजीनामा देण्यास नकार देताना पुन्हा एकदा ही बैठक अनधिकृत ठरविली आणि आपणच मुख्यमंत्रिपदी कायम असल्याचे जाहीर केले.
तत्पूर्वी, मांझी यांनी विधानसभा विसर्जित करण्याची शिफारस केल्यानंतर या निर्णयाला विरोध करणार्या नितीशसमर्थित २१ मंत्र्यांनी मंत्रिमंडळाचा हा निर्णयच बेकायदेशीर असल्याचे पत्र राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांना पाठवले. जदयु अध्यक्ष शरद यादव यांनीही राज्यपालांना पत्र लिहून मांझी यांच्या पत्राची दखल घेण्यात येऊ नये, अशी विनंती केली.
भाजपाचे बारीक लक्ष
दरम्यान, बिहारमधील घडामोडींवर भाजपाचे अतिशय बारीक लक्ष असून, प्रत्येक घडामोडीचा आम्ही काळजीपूर्वक अभ्यास करीत असल्याचे पक्षाने म्हटले आहे. महादलितांवर जदयु अन्याय करीत असल्याचा आरोपही भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केला. बिहारमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी शाह यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मांझी यांच्या हकालपट्टीवर तीव्र चिंता व्यक्त केली.