किमान तापमान : 22.78° से.
कमाल तापमान : 22.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 4.04 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.79°से. - 25.53°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
मंगळवार, 14 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश24.11°से. - 25.55°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
शुक्रवार, 17 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शनिवार, 18 जानेवारी टूटे हुए बादल=भाजपा दुसर्या स्थानावर, कॉंगे्रसचा पार सफाया=
नवी दिल्ली, [७ फेब्रुवारी] – दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी शनिवारी मतदानाची प्रक्रिया पार पडताच सर्वच वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल्सचे अंदाज जाहीर केले. राजधानी दिल्लीतील सत्ता अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीकडे जात असल्याचे यात दिसून आले आहे. अरविंद केजरीवाल यांचा पक्ष दिल्लीत स्पष्ट बहुमतासह सत्तेवर येणार असल्याचे भाकीत सर्वच एक्झिट पोल्सनी केले असून, त्या खालोखाल भाजपाला २८ ते ३२ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कॉंगे्रसला ० ते ३ जागा देण्यात आल्या आहेत.
डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वाधिक ३२ जागांसह दिल्लीत सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आला होता तर, त्याखालोखाल आपला २८ जागा मिळाल्या होत्या. गेली १५ वर्षे सत्तेत असलेल्या कॉंगे्रसला ८ जागांवर समाधान मानावे लागले होते. तथापि, आपने कॉंगे्रसच्या पाठिंब्यावर दिल्लीत सरकार स्थापन केले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच पंतप्रधान होण्याचे स्वप्न उराशी बाळगून केजरीवाल यांनी अवघ्या ४९ दिवसातच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
यावेळची निवडणूक भाजपाच्या हातात सत्ता सोपवेल, असे सुरुवातीचे चित्र होते. पण, दिल्लीच्या मनात नेमके काय, याचा अंदाज कुणालाही घेता आला नाही. निवडणुका जाहीर झाल्या आणि दिल्लीतील राजकीय समीकरण दिवसेंदिवस बदलत गेले. आप आणि भाजपात अटीतटीची निवडणूक होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. बहुतेक सर्वच जनमत चाचण्यांनी सध्या दिल्लीतील सत्ता आपच्या झोळीत टाकली असली, तरी १० फेबु्रवारीला होणार्या मतमोजणीनंतरच खरे चित्र समोर येणार आहे.
न्यूज २४ – चाणक्य
भाजपा २२
आप ४८
कॉंगे्रस ००
अन्य ००
इंडिया न्यूज
भाजपा १७
आप ५३
कॉंगे्रस ००
अन्य ००
झी न्यूज
भाजपा २७
आप ४०
कॉंगे्रस ०३
अन्य ००
इंडिया टीव्ही – सिसेरो
भाजपा २३ ते २९
आप ३५ ते ४३
कॉंगे्रस ०३ ते ०५
अन्य ०० ते ०२
इंडिया टीव्ही
भाजपा २५ ते ३३
आप ३५ ते ४३
कॉंगे्रस ०० ते ०२
अन्य ००
एबीपी न्यूज -नील्सन
भाजपा २६
आप ४३
कॉंगे्रस ०१
अन्य ००