किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल=मांझी यांचा आरोप=
नवी दिल्ली/पाटणा, [९ फेब्रुवारी] – जदयु नेते नितीशकुमार मला ‘रबर स्टॅम्प’ मुख्यमंत्री समजून बसले होते. सत्तेसाठी त्यांनी जे केले, त्यामुळे त्यांचा खरा चेहरा बिहारवासीयांसमोर उघड झाला आहे. माझ्यावर कितीही दबाव आला तरी मी राजीनामा देणार नाही. विधानसभेत मी आपले बहुमत सिद्ध करणारच आहे, अशी भूमिका सध्या संकटात सापडलेले बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी आज रविवारी दिल्लीत विशद केली.
नीती आयोगाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत सहभागी झाल्यानंतर मांझी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मोदी यांच्यासोबत मी कोणतीही राजकीय चर्चा केली नाही. केवळ बिहारला विद्यमान आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत मागितली.
मी अजूनही बिहारचा मुख्यमंत्री आहे. बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्यास नक्की मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन, असे सांगताना, पक्षातील बहुतांश आमदारांचा मला पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला. मी लवकरच आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असून, सरकारमध्ये आता दोन उपमुख्यमंत्री राहणार आहेत. वेळ पडल्यास आपण भाजपाचाही पाठिंबा घेऊ शकतो, असेही ते म्हणाले.
१३० आमदारांच्या पाठिंब्याचा जदयुचा दावा
जदयुने मात्र पक्षातील फुटीचे खापर थेट भाजपावर फोडले आहे. बिहारात अस्थिरता निर्माण करण्यासाठीच भाजपाने जीतन राम मांझी यांना हातचे बाहुले बनविले असल्याचा आरोप या पक्षाने केला. विधिमंडळ पक्षाने आपला नवा नेता निवडला असल्याने मांझी यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी करतानाच, नितीशकुमार यांना १३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावाही जदयुने केला आहे.नितीशकुमार यांच्याकडेच बहुमत आहे, हे सिद्ध करण्यासाठी जदयु, राजद, कॉंगे्रस आणि भाकपाने पाठिंब्याचे पत्रही राज्यपालांकडे सादर करण्यात आले. अपक्ष आमदार दुलालचंद गोस्वामी यांनीही नव्या सरकारला आपला पाठिंबा दिला आहे.
राजीनामा नाहीच, बहुमत सिद्ध करणार, पंतप्रधानांची घेतली भेट
‘मांझीची नौका कधीच बुडत नाही’
बिहारमधील घडामोडींमुळे जराही विचलित न होता, ‘मांझीची नौका कधीच बुडत नसते,’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी व्यक्त केली. नितीशकुमार बिहारचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याने तुमचे भवितव्य काय, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.