किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल=४८ तासात बहुमत सिद्ध करण्याची पक्षाची मागणी=
नवी दिल्ली/पाटणा, [९ फेब्रुवारी] – पक्षादेश झुगारणारे बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्यावर विश्वासघात आणि बेशिस्तीचा आरोप करीत जदयुने आज सोमवारी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. सोबतच, मांझी यांना आपले बहुमत अवघ्या ४८ तासात सिद्ध करण्याची सूचना राज्यपालांनी करावी, अशी मागणीही जदयुने केली.
मांझी हे पक्षविरोधी कारवाया करीत असल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात येत आहे, अशा आशयाचा आदेश जदयु अध्यक्ष शरद यादव यांनी जारी केला. बेशिस्तीकरिता त्यांचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात येत आहे. जदयुच्या घटनेतील कलम ३ नुसार पक्षाध्यक्षांना पक्षातील कुणालाही बेशिस्तीकरिता बडतर्फ करण्याचे अधिकार दिले आहेत, अशी माहिती सरचिटणीस के. सी. त्यागी यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
माझी यांनी पक्षासोबत विश्वासघात केला आहे. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग पक्षाध्यक्षांकडे नव्हता. विश्वासघाताचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा मांझी यांचे नाव सर्वात वर असेल. त्यांनी तर पक्षाध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयावरही टीका केली आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदावर कायम राहण्याचा आणि विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्याचाही अधिकार नाही. कारण, ते आता पक्षाचे सदस्यदेखील राहिले नाही, असे शरद यादव यांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. बिहारमधील या अस्थिर स्थितीसाठी भाजपाच जबाबदार आहे, असा आरोप करून राज्यपाल त्रिपाठी यांनी मांझी यांना येत्या ४८ तासात बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणीही त्यागी यांनी केली.
मांझी बहुमत सिद्ध करतील : भाजपा
दरम्यान, जीतन राम मांझी बहुमत सिद्ध करतील, असा विश्वास त्यांच्या चेहर्यावरच झळकत आहे. मांझी समर्थकांमध्ये उत्साह तर, नितीशकुमार यांच्या तंबूत निरुत्साह दिसत आहे, असे भाजपा प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी सांगितले. मांझी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाने पाठिंबा द्यायला हवा का, याबाबत अद्याप कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.