किमान तापमान : 27.86° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 30 %
वायू वेग : 2.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
24.63°से. - 30.99°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.89°से. - 27.4°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल25.23°से. - 28.14°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.36°से. - 28.06°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर कुछ बादल25.48°से. - 28.59°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.91°से. - 28.55°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल=विधानसभा पोटनिवडणूक=
नवी दिल्ली, [१६ फेब्रुवारी] – नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाने पणजीची जागा स्वत:कडे कायम ठेवली आहे. भाजपाने ही जागा जिंकण्याची सलग सहावी वेळ आहे. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी १९९४ पासून सातत्याने ही जागा जिंकली आहे.
भाजपा उमेदवार सिद्धार्थ कुंकोलिनकर यांनी या पोटनिवडणुकीत कॉंगे्रसचे सुरेंद्र फुर्टाडो यांचा ५३६८ मतांनी पराभव केला. सिद्धार्थ यांना ९९८९ मते मिळाली असून, फुर्टाडो यांना ४६२१ आणि अपक्ष उमेदवार समीर केळकर यांना केवळ ६२४ मते मिळाली.
जनतेने मला आपला कौल दिला आहे. त्यामुळे त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्याची माझी जबाबदारी आहे. मी जनतेची निराशा करणार नाही, असे सिद्धार्थ यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
तिरुपतीत टीडीपीचा मोठा विजय
आंध्रप्रदेशातील तिरुपती विधानसभा मतदारसंघात सत्तारूढ तेलगू देसम पार्टीने मोठा विजय मिळविला आहे. सहानुभूतीच्या लाटेवर स्वार झालेल्या या पक्षाच्या उमेदवार एम. सुगना यांनी एक लाखांपेक्षाही जास्त मतांनी ही जागा जिंकली. विद्यमान आमदाराचे निधन झाल्यास त्याच्याच परिवारातील सदस्य सहजपणे निवडून यायला हवा, या तत्त्वाचे पालन करून कॉंगे्रसने या निवडणुकीत आपला उमेदवार उभा केला नव्हता. गेल्या डिसेंबरमध्ये सुगना यांचे पती आणि टीडीपी आमदार एम. व्यंकटरामन यांचे निधन झाले होते.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचा विजय
पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीत सत्तारूढ तृणमूल कॉंगे्रसने कृष्णगंज विधानसभा आणि बोंगाव लोकसभेची जागा जिंकली आहे. कृष्णगंज जागेवर तृणमूलचे उमेदवार सत्यजित विश्वास यांनी भाजपाचे मानाबेंद्रा यांचा ३६,९६० मतांनी पराभव केला. या निवडणुकीत माकप तिसर्या स्थानावर राहिला. २०११ मध्ये याच जागेवर माकप दुसर्या स्थानावर होता. लोकसभेच्या जागेवर तृणमूलच्या ममताबाला ठाकूर यांनी भाजपाच्या सुब्रत साहा यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.
अरुणाचलची जागा कॉंगे्रसकडेच
दरम्यान, अरुणाचल प्रदेशातील लिरोमोबा विधानसभेची जागा कायम राखण्यात कॉंगे्रसला यश आले आहे. या पक्षाचे उमेदवार नैमार कारबाक यांनी भाजपाचे बी. गाडी यांचा ११९ मतांनी पराभव केला. कारबाक यांना ३८०८ आणि गाडी यांना ३६८९ मते मिळाली. नऊ मतदारांनी नोटाचा वापर केला. गेल्या वर्षी ३० नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री जे. गॅमलिन यांचे निधन झाल्याने ही पोटनिवडणूक घेण्यात आली.