|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:37 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 26.76° से.

कमाल तापमान : 27.99° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 57 %

वायू वेग : 4.09 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

27.99° से.

हवामानाचा अंदाज

23.84°से. - 28.46°से.

शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.34°से. - 27.9°से.

रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

24.54°से. - 28.43°से.

सोमवार, 25 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.56°से. - 28.81°से.

मंगळवार, 26 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.03°से. - 29.2°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.17°से. - 29.17°से.

गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल
Home » आसाम-ईशान्य भारत, ठळक बातम्या, राज्य » आसाम महापालिका निवडणुकीत भाजपाची मुसंडी

आसाम महापालिका निवडणुकीत भाजपाची मुसंडी

BJP-FLAG-RALLY-IN-UP-1गुवाहाटी, [१२ फेब्रुवारी] – आसाम महानगर पालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी मारली असून एकूण ३४० प्रभागांवर विजय मिळविला आहे. दिल्लीतील दारुण पराभवामुळे निराश झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांना आसाममधील दणदणीत विजयामुळे दिलासा मिळाला आहे. याबरोबरच ३० म्यूनिसिपल बोर्ड आणि नगर परिषदांवरही भाजपाचा झेंडा फडकला आहे. ७४३ पैकी ७०२ प्रभागांचे निवडणूक निकाल घोषित करण्यात आले. गोलाघाट आणि सिल्चरचे निकाल मात्र येणे बाकी आहेत, असे आसाम राज्य निवडणूक आयुक्त एच. एन. बोरा यांनी सांगितले.
भाजपाने ३४० प्रभागांवर दणदणीत विजय मिळविला असून कॉंग्रेसला २३२, आसाम गण परिषदेला ३९, एआययुडीएफला ८, एनसीपीपीला ४, बीपीएफ आणि सीपीएमला प्रत्येकी एक तर ७७ जागी अपक्षांनी विजय मिळविला आहे. एकूण ७४ म्युनिसिपल बोर्ड आणि समित्यांपैकी ३० ठिकाणी भाजपाला बहुमत मिळाले आहे. तर कॉंग्रेसला १७, आगपला दोन आणि राकॉंला एका ठिकाणी बहुमत मिळाले आहे. पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजपाचा हा विजय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

Posted by : | on : 13 Feb 2015
Filed under : आसाम-ईशान्य भारत, ठळक बातम्या, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g