किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलपाटणा, [१२ फेब्रुवारी] – बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी येत्या २० फेब्रुवारी रोजी आपले बहुमत सिद्ध करावे, असे निर्देश राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात आणखी काही नाट्यमय घडामोडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
२० फेब्रुवारीपासून बिहार विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मांझी यांनी आपले बहुमत सिद्ध करावे, असे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत. त्यादिवशी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर लगेचच विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. दरम्यान, राजीनामा न देण्यावर ठाम असलेले मुख्यमंत्री मांझी लवकरच नवा पक्ष काढण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. जदयुने मांझी यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी मांझी यांना पाठिंबा देणार की नाही, याबाबत भाजपाने अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. अशा स्थितीत इतर कोणत्या पक्षात जाण्याऐवजी मांझी नवा पक्ष स्थापन करण्याची प्रबळ शक्यता आहे.
जदयुच्या काही आमदारांसोबतच लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या एका गटाने मांझी यांना पाठिंबा दिला आहे. हे सगळे एकजूट झाले तर नवा पक्ष स्थापन होऊ शकतो. मांझी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी २० फेब्रुवारीपर्यंत मुदत दिल्यामुळे घोडेबाजाराला ऊत येऊ शकतो, असे माजी मुख्यमंत्री व जदयु नेते नितीशकुमार यांनी म्हटले आहे. नितीशकुमार यांनी १३० समर्थक आमदारांची बुधवारी रात्री राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासमोर परेड केली होती, हे याठिकाणी उल्लेखनीय.