किमान तापमान : 24.75° से.
कमाल तापमान : 27.58° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 50 %
वायू वेग : 6.52 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.58° से.
23.71°से. - 28.99°से.
रविवार, 12 जानेवारी छितरे हुए बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, [२८ जुलै] – जोपर्यंत पाकिस्तान त्यांच्या सीमेवरून होणार्या अतिरेकी कारावायांवर आळा घालत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत क्रिकेट संबंध निर्माण होऊच शकत नाही, असे प्रतिपादन भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने करीत बीसीसीआयने काल घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केले आहे.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) भारताविरुद्धच्या मालिकेचे यजमानपद स्वीकारण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळाच्या वतीने २०२३ सालच्या शेवटपर्यंत आठ वर्षांच्या या काळात पाच मालिका खेळविण्याच्या करारावर स्वाक्षर्या करण्यात आल्या आहेत. या कराराच्या पार्श्वभूमीवर पीसीबीच्या प्रस्तावावर विचार करण्याचे आश्वासन भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) देण्यात आले होते. मात्र, काल सोमवारी गुरुदासपूर येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडताना म्हटले आहे की, अशा परिस्थितीत पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळले जाऊ शकत नाही.
दरम्यान, सौरव गांगुली एका खाजगी कार्यक्रमासाठी येथे आला असता पत्रकारांशी बोलताना तो म्हणाला की, बीसीसीआयने जी भूमिका घेतली आहे, ती योग्य आहे. दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंध सुरळीत होण्यासाठी पाकिस्तानने दहशतवादाचा समूळ नायनाट करायलाच हवा. एक मनुष्य म्हणून आपलीही इच्छा आहे की दहशतवादाचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे.
भारत-पाकिस्तान मालिका अतिशय रोमहर्षक, मनोरंजक आणि संघर्षपूर्ण होत असते, हे जरी मान्य असले तरी त्यामुळे अतिरेकी हल्ल्यात दगावलेल्यांच्या कुटुंबांच्या आणि त्यात जखमी झालेल्यांच्या वेदना कमी होऊ शकत नाहीत. सोमवारी घडलेल्या गुरुदासपूर येथील घटनेमुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यावर क्रिकेट सामन्यामुळे फुंकर घालता येत नाही, असेही सौरव म्हणाला.
न्याय प्रक्रियेनंतर स्पॉट फिक्सिंग प्रकरणात निर्दोष सुटलेला श्रीसंत याला बीसीसीआयनेही न्याय द्यावा, अशी अपेक्षाही गांगुलीने व्यक्त केली. बीसीसीआयने श्रीसंतवर आजीवन बंदी घातली आहे.