किमान तापमान : 24.05° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 6.18 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल=विज्ञान जगतात नवा शोध=
मुंबई , [३० मार्च] – सार्वजनिक ठिकाणी कचर्यामध्ये ढिगाने दिसणार्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांमुळे पर्यावरणाला हानी पोहोचते, हे माहीत असूनही अशा बाटल्यांचे करायचे काय, याचे उत्तर न सापडल्याने अनेकजण रस्त्यात त्या बाटल्या फेकून देतात. आता मात्र पाणी प्यायल्यानंतर बाटली आपोआप नष्ट होईल, अशा बाटल्या विकसित करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे.
आईसलॅड ऍकाडमी ऑफ आर्ट्समध्ये प्रॉडक्ट डिझाईन ऍण्ड आर्किटेक्चर शिकणार्या ऍरी जॉन्सन या विद्यार्थ्याने अशाप्रकारची एक अभिनव बाटली विकसित केली आहे. या बाटलीतील पाणी संपले की ती आपोआपच नष्ट होते. शेवाळापासून बनणार्या पावडरपासून बनवण्यात आलेली ही बाटली असून ही पावडर पाण्याच्या संपर्कात आली की एक प्रकारची जेली तयार होते. त्यापासूनच ही बाटली बनवण्यात आली आहे. या बाटलीतील पाणी संपले की बाटली आपोआप आकुंचन पावते आणि नष्ट होते.
प्लास्टिक नष्ट होण्यासाठी, त्याचे विघटन होण्यासाठी किमान साडेचारशे ते हजारो वर्षे लागतात. त्या तुलनेत प्लास्टिकची निर्मिती मात्र थक्क करणार्या वेगाने होत आहे. प्लास्टिकचा अनिर्बंध वापर हा शास्त्रज्ञ आणि पर्यावरण तज्ज्ञांसाठी मोठा काळजीचा विषय आहे. पण त्यावर काही प्रमाणात का होईना मात करणे आता शक्य होणार आहे.
जगभरात पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची ज्या प्रमाणात निर्मिती होते आणि त्याचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम पाहून ऍरीला या विषयावर काम करावेसे वाटले. विशिष्ट प्रकारच्या शेवाळापासून बनवलेली पावडर पुन्हा पाण्याच्या संपर्कात आली तर जेलीसारखी बनते आणि त्याला हवा तो आकार देता येतो, हे त्याला समजले. त्यानंतर त्याने या जेलीला पिण्याच्या पाण्याच्या बाटलीसारखा आकार दिला. हे सर्व करताना जेली पाण्याबाहेर येणार नाही, हे पाहिले. म्हणजेच ही शेवाळापासून बनलेली जेली पाण्याबाहेर आली की सुकते. त्यानंतर पुन्हा त्याची पावडर होते.
शेवाळ हे पूर्णपणे सेंद्रीय म्हणजे नैसर्गिक आणि डिस्पोजेबल असल्यामुळेच त्याने यावर प्रयोग केले. अर्थातच बाटलीतील पाणी संपले की नष्ट होणारी ही बाटली अजून पूर्णपणे प्राथमिक अवस्थेत असून ऍरीने फक्त एक दिशा दाखवली आहे. मात्र, अद्याप या संकल्पनेचा व्यावसायिक वापर सुरू झालेला नाही.