किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल=रा. स्व. संघाची भूमिका=
पणजी, [१९ जानेवारी] – पोर्तुगालचे पंतप्रधान ऍन्टोनिओ कोस्टा हे जर गोव्याच्या भेटीवर येणार असतील, तर तब्बल ४५० वर्षांच्या राजवटीत गोव्यावर अन्याय केल्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विशद केली.
गोव्याच्या भूमीत पोर्तुगालच्या पंतप्रधानांचे स्वागत आणि सन्मान व्हावा, हे आम्ही कदापि मान्य करणार नाही. पण, येथील भाजपा सरकारला त्यांचा सन्मान करायलाच असेल आणि तो स्वीकारण्यासाठी पोर्तुगालचे पंतप्रधान येथे येत असतील, तर ४५० वर्षे येथील नागरिकांवर अन्याय केल्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी, असे संघाचे गोवा प्रांत प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांनी अलीकडेच कोस्टा यांना आपले सरकार गोवा भेटीचे निमंत्रण देऊ शकते, असे संकेत दिले होते. त्यानंतर गोवा सरकारमध्ये भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे मंत्री रामकृष्ण धावलीकर यांनी, कोस्टा यांच्या गोवा भेटीला आपला विरोध नाही. पण, त्यांनी गोवेकरांची माफी मागायलाच हवी, अशी मागणी केली होती. याच अनुषंगाने संघाने आज आपली भूमिका विशद केली.
पोर्तुगिजांनी आपल्या सत्ताकाळात गोव्याचा जो विध्वंस केला, तो कधीही भरून न निघणारा असून, यासाठी त्यांना माफही केले जाऊ शकत नाही. गोव्याला गुलाम बनविणार्या पोतुगिजांनी जाहीरपणे माफी मागायलाच हवी, असे वेलिंगकर यांनी सांगितले.