किमान तापमान : 24.42° से.
कमाल तापमान : 25.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 3.09 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.99° से.
23.29°से. - 28.55°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल23.28°से. - 28.56°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.22°से. - 28.61°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.05°से. - 26.8°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश22.52°से. - 27.89°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल22.33°से. - 26.62°से.
रविवार, 01 डिसेंबर टूटे हुए बादल=अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन, गडकरी करणार समारोप=
कोल्हापूर, [२२ मे] – महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यकारिणी आणि राज्य परिषदेची बैठक कोल्हापुरात बैठक बोलावण्यात आली आहे. आज शुक्रवारी राज्य परिषदेची बैठक पार पडली असून, उद्या शनिवारी कार्यकारिणीची बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत होणार असून, रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे.
या बैठकीला ‘झेप’ असे नाव देण्यात आले असून, महाराष्ट्र भाजपा आणि राज्य सरकारपुढील आव्हाने, नागरिकांसाठी राबविण्यात येणार्या योजना आणि इतर मुद्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे. तसेच काही ठोस उपाययोजनाही केल्या जाणार आहेत.
अमित शाह आणि नितीन गडकरी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि राज्य व राष्ट्रीय स्तरावरील भाजपाचे वरिष्ठ नेते व मंत्री या बैठकीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या सभास्थळाला दिवंगत गोपीनाथ मुंडे नगरी असे नाव देण्यात आले आहे.
भाजपाच्या प्रदेश पदाधिकार्यांची बैठक शुक्रवारी पार पडली. उद्या शनिवारपासून राज्य कार्यकारिणीला प्रारंभ होत आहे. रविवारच्या बैठकीत रावसाहेब दानवे यांच्या प्रदेशाध्यक्षपदावरील नियुक्तीवर औपचारिक शिक्कामोर्तब करण्यात येईल. यानंतर ते प्रदेशाध्यक्ष या नात्याने बैठकीला संबोधित करतील. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. ही बैठक ४ ते ६ मे या काळात होणार होती. पण, संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती.
या बैठकीसाठी येणारे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अन्य मान्यवरांची निवास, जेवण आणि विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्रात भाजपाचे सरकार असल्याने या बैठकीला विशेष महत्त्व दिले जात आहे. या बैठकीसाठी येथील पेटाळा मैदानावर भव्य शामियाना उभारण्यात आला आहे.