किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल=जयललिता यांचा थाटात शपथविधी, राज्यभर प्रचंड जल्लोष=
चेन्नई, [२३ मे] – बेहिशेबी संपत्तीच्या खटल्यातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता आज शनिवारी पाचव्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्या. मद्रास विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित एका शानदार समारंभात राज्यपाल के. रोसय्या यांनी जयललिता यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधी सुरू असताना संपूर्ण तामिळनाडूत अण्णाद्रमुक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक प्रचंड जल्लोष करीत होते.
जयललिता यांच्यासोबतच २८ मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. विशेष म्हणजे, सुपरस्टार रजनीकांत यांनी जयललितांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावल्याने सभागृहात उपस्थितांमध्ये आगळाच उत्साह होता. जयललिता यादेखील जुन्या काळातील नावाजलेल्या अभिनेत्री आहेत.
शुक्रवारी पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी जयललिता यांची एकमताने निवड झाल्यानंतर ओ. पन्नीरसेल्वम् यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर जयललिता यांनी राजभवनात जाऊन सत्तास्थापनेचा दावा सादर केला. शनिवारी सकाळी अकरा वाजता तामिळनाडूत पुन्हा एकदा ‘अम्मा’ म्हणून ओळखल्या जाणार्या जयललितांच्या सत्तायुगाला प्रारंभ झाला. तत्पूर्वी, जयललिता यांचे मद्रात विद्यापीठ परिसरात आगमन झाल्यानंतर राज्याचे मुख्य सचिव नंदेसिकन यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जल्लोषात स्वागत केले. शपथविधी सोहळा सुरू होण्यापूर्वी त्यांनी पन्नीरसेल्वम् आणि शपथ घेणार असलेल्या अन्य मंत्र्यांची ओळख करून दिली. शपथविधी सोहळ्यानंतर त्यांनी आपल्या मंत्रिमंडळाचे खातेवाटपही जाहीर केले.
बेहिशेबी संपत्ती जमा केल्याप्रकरणी बंगळुरू येथील विशेष न्यायालयाने जयललिता यांना गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दोषी ठरवून चार वर्षांचा कारावास आणि १०० कोटी रुपयांच्या आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावली होती. त्यांनी दोषी ठरविण्याच्या आणि शिक्षेच्या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. गेल्या ११ मे रोजी उच्च न्यायालयाने त्यांना या खटल्यातून निर्दोष मुक्त केले होते.