किमान तापमान : 25.86° से.
कमाल तापमान : 26.61° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 1.98 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.61° से.
24°से. - 28.53°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल23.61°से. - 28.82°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.07°से. - 28.75°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.01°से. - 28.78°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.12°से. - 27.87°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल22.59°से. - 28.12°से.
रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादलनवी दिल्ली, [२४ मे] – अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीला दिल्लीत सत्तेवर येऊन आज रविवारी शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. पण, शंभर दिवसांचा हा कार्यकाळ केजरीवाल ऍण्ड कंपनीचा सत्तेसाठीचा संघर्ष आणि नौटंकी यातच वाया गेला असल्याची सर्वसाधारण भावना दिल्लीकरांकडून व्यक्त केली जात आहे.
केजरीवाल यांनी वीजदरात ५० टक्के सवलत आणि महिन्याला २० हजार लिटर मोफत पाणी यासह अनेक मोठमोठी वचने दिल्लीकरांना दिली होती. पण, या शंभर दिवसात सरकारने वचनांची पूर्तता तर दूरच, ती पूर्ण करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही, अशी टीका आता स्वत: दिल्लीकरच करीत आहेत.
केंद्रशासित प्रदेश असलेल्या राजधानी दिल्लीवर स्वत:ची पकड मजबूत करण्यासाठी केजरीवाल यांनी केंद्र सरकारसोबतच घटनात्मक पदावर विराजमान असलेल्या नायब राज्यपालांसोबतही ‘पंगा’ घेतला. नायब राज्यपाल हे केंद्र सरकारचे ‘व्हाईसराय’ असल्याचा ठपका ठेवताना, हे दोघेही लोकनियुक्त सरकारला जनहिताची कामे करण्यापासून रोखत आहेत, असा आरोप त्यांनी केला. नायब राज्यपालांनी केलेल्या नियुक्त्या मान्य करण्यास नकार देत त्यांनी चक्क मुख्य सेवा सचिवांच्या कार्यालयालाही टाळे ठोकले होते.
आपल्या सरकारच्या काळात भ्रष्टाचार पूर्णपणे संपुष्टात आला असल्याचा दावा करणारे केजरीवाल यांनी भ्रष्ट अधिकार्यांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी १०३१ या क्रमांकाची हेल्पलाईन सुरू केली. मात्र, खुद्द त्यांच्याच कन्येने वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी वाहतूक अधिकार्याला लाच देण्याचा प्रयत्न केला. मी स्वत:च माझ्या मुलीला लाच देण्याचा सल्ला दिला होता, असे जाहीरपणे सांगणार्या केजरीवाल यांच्याविरोधात या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
शंभर दिवसात राजकीय नौटंकीशिवाय दुसरे काहीच केले नसले, तरी केजरीवाल यांनी आपल्या सरकारच्या शंभर दिवसांच्या उपलब्धींची लोकांना माहिती देण्यासाठी उद्या सोमवारी येथील सेंट्रल पार्कवर भव्य समारंभाचे आयोजन केले आहे. या समारंभात केजरीवाल सरकारमधील सर्व मंत्री आपापल्या कामाचा लेखाजोखा सादर करणार आहेत.