किमान तापमान : 25.19° से.
कमाल तापमान : 25.72° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 2.21 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.72° से.
24.15°से. - 28.89°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.8°से. - 28.3°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर घनघोर बादल24.7°से. - 28.55°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.02°से. - 28.98°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 29.35°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.29°से. - 29.02°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल=उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक=
नवी दिल्ली, [१८ मार्च] – उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीला एक वर्ष असले, तरी राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्व प्रमुख पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. सपा आणि बसपाने आपले मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर केले आहेत, मात्र भाजपाने आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार अद्याप जाहीर केला नाही. त्यामुळे भाजपाचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण राहणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणूक यावेळी चौरंगी होण्याची शक्यता आहे. उत्तरप्रदेशात सध्या सपाची राजवट असून, अखिलेश यादव मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे अखिलेश यादव यांच्या नेतृत्वातच सपा विधानसभा निवडणूक लढवणार, हे निश्चित आहे. राज्यात सपाला बहुमत मिळाले, तर अखिलेश यादव दुसर्यांदा मुख्यमंत्री होऊ शकतात.
बहुजन समाज पार्टी मायावती यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणुकीला समोरे जात आहे. राज्यात बसपाला बहुमत मिळाले, तर मायावती या मुख्यमंत्री होऊ शकतात. याआधीही दोनदा मायावती यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्रिपद भूषवले आहे.
कॉंग्रेस पक्ष राज्यात निवडणूक लढवत असला, तरी त्याची फारशी ताकद नाही, त्यामुळे कॉंग्रेस कोणाच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढवणार वा त्याचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण हा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र भाजपाचे तसे नाही. लोकसभा निवडणुकीत राज्यातील ८० पैकी ७१ जागा भाजपाने जिंकल्या आहेत. राज्यात भाजपा हा सत्तेचा प्रमुख दावेदार आहे. त्यामुळे भाजपा कोणाच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढवणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजपाने अद्याप आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला नाही. मात्र भाजपात मुख्यमंत्रिपदासाठी अनेक सक्षम उमेदवार आहेत.
मुख्यमंत्रिपदासाठी भाजपात अनेक नावांची चर्चा असली, तरी काही दिवसांपासून गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ यांचे नाव आघाडीवर आले आहे. योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा मुख्यमंत्रिपदासाठी विचार झाला, तर त्याला आपला विरोध राहणार नाही, उलट आपल्याला आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय पर्यटन मंत्री डॉ. महेश शर्मा यांनी व्यक्त केल्यामुळे योगी आदित्यनाथ यांना भाजपा आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करेल का, अशी चर्चा राजधानीत सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक राजधानी दिल्लीत उद्यापासून सुरू होत असताना डॉ. महेश शर्मा यांनी हे विधान केल्यामुळे त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
भाजपा खासदार रवींद्र कुशवाह यांनीही काही दिवसांपूर्वी योगी आदित्यनाथ यांना भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर करण्याची मागणी केली होती. उत्तरप्रदेशातील बहुसंख्य भाजपा खासदार योगी आदित्यनाथ यांच्या बाजूने असल्याचा दावाही कुशवाह यांनी केला. योगी आदित्यनाथ यांची आक्रमक हिंदुत्ववादी नेता अशी प्रतिमा आहे.