किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलश्रीनगर, [४ एप्रिल] – पीडीपी पक्षाच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी सोमवारी सकाळी जम्मू – काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ५६ वर्षीय मेहबूबा या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
मेहबूबा मुफ्ती यांच्यासह आघाडीचे १६ कॅबिनेट व ८ राज्यमंत्र्यानी पदाची शपथ घेतली. भाजपचे डॉ. निर्मल सिंह यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यातील भाजपाच्या दोन मंत्र्यांना स्वतंत्र प्रभार देण्यात आला आहे. पीडीपीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मंत्रिमंडळातील पक्षाचे सर्व मंत्री कायम राहतील. यावेळी केंद्रीय मंत्री व्यंकेय्या नायडू व जितेंद्र सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच भाजपचे नेते राम माधव यांच्यासह राज्याचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्लाही उपस्थित होते.
मेहबूबा या देशातील दुसर्या महिला मुस्लिम मुख्यमंत्री बनल्या आहेत. यापूर्वी ६ डिसेंबर १९८० रोजी सईदा अन्वरा तायमूर यांना देशातील पहिल्या मुस्लिम मुख्यमंत्री बनल्या होत्या.
दरम्यान, जम्मू – काश्मीरचे मुख्यमंत्री आणि पीडीपी पक्षाचे प्रमुख मुफ्ती मोहम्मद सईद यांचे जानेवारी महिन्यात निधन झाले. त्यानंतर त्यांच्या जागेवर मेहबूबा मुफ्ती आज मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या.