किमान तापमान : 23.61° से.
कमाल तापमान : 23.86° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 45 %
वायू वेग : 3.82 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.86° से.
23.43°से. - 28.55°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल23.28°से. - 28.56°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.22°से. - 28.61°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.05°से. - 26.8°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश22.52°से. - 27.89°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल22.33°से. - 26.62°से.
रविवार, 01 डिसेंबर टूटे हुए बादलश्रीनगर, [६ एप्रिल] – येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत (एनआयटी) गेल्या महिन्यात देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणांचे तीव्र पडसाद अजूनही कायम असताना, अशा घोषणा देणार्या विद्यार्थ्यांना बाहेर हाकलणार्या गैरकाश्मिरी विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अमानूष लाठीमार केला. यामुळे एनआयटी कॅम्पसमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी राज्याच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना फोन करून विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्याची सूचना केली. तर, मनुष्य बळ मंत्रालयातील एका उच्चस्तरीय पथकानेही आज बुधवारी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन, त्यांना संपूर्ण सुरक्षेची हमी दिली.
राष्ट्रविरोधी घोषणा देणार्या विद्यार्थ्यांविरोधात तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पुढे करून, आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय पथकाला सहकार्य करण्यास स्पष्ट नकार दिला. तीन सदस्यीय केंद्रीय पथकाचे आज सकाळीच येथे आगमन झाले होते. तणाव वाढत असल्याचे लक्षात येताच, मेहबुबा मुफ्ती यांनीही दोषी विद्यार्थ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
नुकसान होणार नाही : इराणी
या तणावाच्या पार्श्वभूमीवर आमचे शैक्षणिक वर्ष वाया जाईल, अशी भीती बहुतांश विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्यानंतर, सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक ती सुरक्षा पुरविली जाईल आणि कोणाचेही शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, अशी ठोस ग्वाही स्मृती इराणी यांनी दिली. माझ्या मंत्रालयातील पथक आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची समजूत घालत आहे. लवकरच स्थिती पूर्वपदावर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राजनाथसिंहांचाही फोन
गृहमंत्री राजनाथसिंह यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि स्थिती आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक ते सहकार्य उपलब्ध होईल, अशी ग्वाही दिली.
काय आहे घटना
टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताचा वेस्ट इंडीजकडून पराभव झाल्यानंतर काही काश्मिरी विद्यार्थ्यांनी जल्लोष केला होता व देशविरोधी घोषणा दिल्या. इतर राज्यांमधून तेथे शिकण्यासाठी आलेल्या गैरकाश्मिरी विद्यार्थ्यांनी विरोध केला. त्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर एनआयटी प्रशासनाने वसतिगृह आणि वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. प्रकरण निवळल्यानंतर पुन्हा वसतिगृह आणि वर्ग पूर्ववत सुरू करण्यात आले. मात्र, गैरकाश्मिरी विद्यार्थ्यांच्या एक गटाने देशविरोधी घोषणा देणार्या विद्यार्थ्यांना कॅम्पसबाहेर हाकलून लावण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला.
सीआरपीएफ तैनात
एनआयटी कॅम्पसमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाल्याने केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवानही या परिसरात तैनात करण्यात आले आहेत. पोलिसही संवेदनशील भागात गस्त घालत असून, सुरक्षा यंत्रणा स्थितीवर नजर ठेवून आहेत.