किमान तापमान : 24.42° से.
कमाल तापमान : 25.47° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 42 %
वायू वेग : 3.09 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.47° से.
23.29°से. - 28.55°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल23.28°से. - 28.56°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.22°से. - 28.61°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.05°से. - 26.8°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश22.52°से. - 27.89°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल22.33°से. - 26.62°से.
रविवार, 01 डिसेंबर टूटे हुए बादल=आसाम वाचावा, ही अपेक्षा: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले कॉंग्रेसला लक्ष्य=
राहा (आसाम), [८ एप्रिल] – बॅकसीट ड्रायव्हिंग आणि रिमोट कंट्रोलमुळे संपूर्ण देश त्रस्त झाला आहे, आसाम मात्र यातून वाचला पाहिजे. आसामच्या जनतेने अस्थिर सरकारपासून स्वत:ला वाचवले पाहिजे, असा इशारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील एका प्रचार सभेत कॉंग्रेसला लक्ष्य केले.
आसाममधील या निवडणूक प्रचार सभेला संबोधताना मोदींनी कॉंग्रेसपक्षावर चांगलेच टीकास्त्र सोडले. आसाममध्ये अफवा पसरवून येथील सरकार अस्थिर करणार्या आणि विकासाच्या मुद्यावर कांगावा करणार्या पक्षाऐवजी बहुमताने भाजपाच्याच उमेदवाराला निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित आसामच्या जनतेला केले.
माजी पंतप्रधान मनमोहनसिंगांच्या, आमचे सरकार बोलण्यापेक्षा कामावर अधिक भर देते या विधानावर निशाणा साधत पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटले की, मनमोहनसिंग जे म्हणाले ते अगदी खरे आहे, कारण सिंगांनी त्यांच्या कार्यकाळात केलेले घोटाळे आता बोलू लागले आहेत. इतकेच नव्हे तर कॉंग्रेसच्या कार्यकाळात बॅकसीट ड्रायव्हिंग आणि रिमोट कंट्रोलमुळे चालणार्या सरकारमुळेच देश त्रासून गेला होता. आता आसामलाही अशा बॅकसीट ड्रायव्हिंगमुळे झटका हवा आहे का, असा सवाल करत त्यांनी, आसामच्या जनतेला म्हटले की, कॉंग्रेसला या देशात काहीही रस नाही, त्यामुळेच रिमोट कंट्रोल अन्य कोणाच्याही हातात तुम्ही देऊ नका, असे आवाहनही मोदी यांनी केले.
आसाममध्ये कॉंग्रेसच्या काळात झालेल्या शारदा चीट फंड घोटाळ्याचा मुद्दा यावेळी पहिल्यांदाच मोदींनी प्रचारसभेत मांडला. या घोटाळ्यासारखे अन्य घोटाळे भविष्यात होऊ नयेत यासाठीच आम्ही जनधन योजना सुरू केली आहे, असे सांगून त्यांनी, शारदा घोटाळ्यातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.