किमान तापमान : 25.86° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 36 %
वायू वेग : 1.98 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
24°से. - 28.53°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल23.61°से. - 28.82°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.07°से. - 28.75°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.01°से. - 28.78°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.12°से. - 27.87°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल22.59°से. - 28.12°से.
रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादल=आम आदमी सेनेच्या कार्यकर्त्याला अटक=
नवी दिल्ली, [९ एप्रिल] – दुसर्या टप्प्यातील सम-विषम अभियानाची घोषणा करण्यासाठी दिल्ली सचिवालयात आयोजित पत्रपरिषदेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आज शनिवारी आम आदमी सेनेच्याच कार्यकर्त्याने बुट फेकल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली. बुट फेकणार्या वेदप्रकाश नावाच्या कार्यकर्त्यांला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐकदा ऐरणीवर आला आहे.
दिल्ली सरकार १५ एप्रिलपासून राजधानी दिल्लीत पुन्हा सम-विषय अभियान सुरू करीत आहे. या अभियानाची घोषणा करण्यासाठी दिल्ली सरकारतर्फे पत्रपरिषद बोलावण्यात आली होती. दिल्लीचे परिवहन मंत्री गोपाल राय यांनी या अभियानाची प्राथमिक माहिती दिल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल बोलायला लागले. केजरीवाल बोलत असतानाच एक तरुण उठला आणि सीएनजी स्टीकर देण्यात मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असल्याचा आरोप करीत त्याने कुणाला काही कळायच्या आतच केजरीवाल यांच्या दिशेने आधी सीडी आणि नंतर बुट भिरकावला. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील अधिकार्यांनी हा बुट मधल्यामध्ये झेलल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
केजरीवाल यांच्या बाजूला उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया बसले होते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. पत्रपरिषदेत उपस्थित सुरक्षा अधिकार्यांनी वेदप्रकाश नावाच्या तरुणाला ताब्यात घेतले आणि बाहेर नेले. दरम्यान, आम आदमी पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी या तरुणाला मारहाणही केली. विशेष म्हणजे या घटनेनंतर केजरीवाल थोडे विचलित झाल्यासारखे दिसले, पण त्यांनी आपली पत्रपरिषद सुरू ठेवली. दिल्लीत १५ ते ३० एप्रिलपर्यंत सम-विषम अभियान राबवले जाणार आहे. या अभियानाचा तपशील केजरीवाल यांनी यावेळी सांगितला.
सीएनजी स्टिकर घोटाळा
या अभियानातून सुट मिळण्यासाठी जारी करण्यात येणार्या सीएनजी स्टिकरची खुलेआम विक्री सुरू असून यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप बुट फेकणार्या वेदप्रकाश नावाच्या तरुणाने केला. आपण या सार्या प्रकाराचे स्टिंग ऑपरेशन केले असून, आपल्या प्रश्नांना मुख्यमंत्री केजरीवाल उत्तर देत नसल्याचा आरोप करीत वेदप्रकाशने आधी सीडी आणि नंतर बुट भिरकावला.
पहिल्या टप्प्यात शाई फेकली
पहिल्या टप्प्यातील सम-विषम अभियान यशस्वी झाल्यानंतर छत्रसाल स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमात भावना नावाच्या महिलेने केजरीवाल यांच्यावर शाई फेकली होती. या घटनेने त्यावेळी खळबळ उडाली होती. भाजपा आणि कॉंग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी या घटनेचा निषेध केला.