किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल=६१ जागांसाठी सोमवारी मतदान=
नवी दिल्ली, [९ एप्रिल] – आसाम विधानसभा निवडणुकीसाठी महिनाभरापासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी आज शनिवारी सायंकाळी शांत झाली. राज्यात दुसर्या टप्प्यातील ६१ जागांसाठी सोमवार, ११ एप्रिलला मतदान होणार आहे.
आसाम विधानसभेच्या १२६ जागांपैकी पहिल्या टप्प्यातील ६५ जागांसाठी ४ एप्रिलला मतदान झाले होते, आता दुसर्या टप्प्यात ६१ जागांसाठी ११ एप्रिलला मतदान होत आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीपैकी सर्वांत प्रथम आसामातील निवडणूक संपली. मात्र या निवडणुकीत आसामच्या जनतेने कुणाच्या पारड्यात आपला कौल दिला, यासाठी १९ मेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
आसामची निवडणूक यावेळी अतिशय चुरशीची झाली. आतापर्यंत आसाममध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला सहज विजय मिळत होता. कारण कॉंग्रेसच्या विरोधात कोणताही तगडा विरोधी पक्ष राहात नव्हता. यावेळी मात्र भाजपाने कॉंग्रेसच्या तोंडचे पाणी पळवले आहे. भाजपाने आसाम गण परिषद आणि बोडोलॅण्ड पीपल्स फ्रंटसोबत युती करीत कॉंग्रेससमोर मोठे आव्हान उभे केले आहे. आतापर्यंत झालेल्या सर्वच जनमत चाचण्यांनी आसमामध्ये भाजपाची सत्ता येणार असल्याचे संकेत दिले आहे.
यावेळी आसाममध्ये खरी लढत मुख्यमंत्री तरुण गोगोई आणि भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार केंद्रीय मंत्री सर्बांनंद सोनोवाल यांच्यात आहे. ७९ वर्षाचे गोगोई गेल्या १५ वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत. मात्र यावेळी जनतेला नव्या दमाचा मुख्यमंत्री हवा असल्याचे प्रचारादरम्यान दिसून आले. भाजपाच्या प्रचाराची धुरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर होती. मोदी यांनी राज्यात अनेक प्रचारसभा घेतल्या. राज्यात त्रिशंकू नाही, तर स्पष्ट बहुमताचे सरकार देण्याचे आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला केले.
राज्यात मोदी यांच्याशिवाय भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथसिंह, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांनी भाजपाचा झंझावाती प्रचार केला. जेटली यांनी भाजपाच्या व्हिजन डाक्युमेंटचे प्रकाशन केले होते. आसाम गण परिषदेशी भाजपाची युती घडवून आणण्यात भाजपाचे राष्ट्रीय महासचिव आणि आसामचे प्रभारी राम माधव यांची मोठी भूमिका राहिली. राज्यातील भाजपाच्या निवडणुकीची जबाबदारी भाजपा महासचिव अरुणसिंह यांच्याकडे आहे.
कॉंग्रेसतर्फे अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी प्रचाराची जबाबदारी सांभाळली. डॉ. मनमोहनसिंग आतापर्यंत आसाममधूनच राज्यसभेवर निर्वाचित होत होते. त्यामुळे आसामशी त्यांचा तसा जवळचा संबंध मानला जातो. तथापि, आसामच्या विकासात डॉ. मनमोहनसिंग यांचे फार योगदान दिसून आले नाही.
मुख्यमंत्री गोगोई यांच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात आसामचा फारसा विकास झाला नाही. आसाम १५ वर्षापूर्वी जिथे होते, तिथेच आजही आहे. त्यामुळे आसामच्या जनतेला यावेळी परिवर्तन हवे आहे. परिवर्तनाच्या दिशेने आसामच्या जनतेने मतदान केले आहे.