किमान तापमान : 24.29° से.
कमाल तापमान : 24.76° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 44 %
वायू वेग : 4.06 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.76° से.
23.91°से. - 28.21°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल23.88°से. - 28.16°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.85°से. - 28.29°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.36°से. - 26.86°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश23.11°से. - 27.74°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल23.04°से. - 26.29°से.
रविवार, 01 डिसेंबर टूटे हुए बादलअहमदाबाद, [१६ एप्रिल] – वरिष्ठ आयपीएस अधिकारी पी. पी. पांडे यांनी आज शनिवारी गुजरातचे प्रभारी पोलिस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला. मावळते पोलिस महासंचालक पी. सी. ठाकूर यांची दिल्लीला बदली करण्यात आल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.
इशरत जहॉं आणि इतर तीन जणांच्या कथित बनावट चकमक प्रकरणी सध्या जामिनावर असलेल्या पांडे यांनी १८ महिने तुरुंगवास भोगला आहे. सध्या हे प्रकरण सत्र न्यायालयात प्रलंबित आहे.
‘मी गेल्या ३५ वर्षांपासून गुजरातमध्ये पोलिस अधिकारी म्हणून काम करीत असून, प्रत्येक क्षण गुजरातला समर्पित आहे. माझी क्षमता पणाला लावून राज्यातील जनतेची सेवा करणे हेच माझे कर्तव्य आहे,’ असे पांडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गांधीनगर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्य सरकारने शुक्रवारी रात्री उशिरा ठाकूर यांना कार्यमुक्त केल्याची अधिसूचना जारी केली आणि पांडे यांच्याकडे कार्यभार सुपूर्द केला.
इशरत जहॉं बनावट चकमक प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर पांडे यांना निलंबित करण्यात आले होते. परंतु, ५ फेब्रुवारी २०१५ रोजी जामिनावर मुक्त होताच त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. राज्य सरकार पोलिस महासंचालकपदावर स्थायी नियुक्ती करेल की, पांडे यांनाच प्रभारी महासंचालक म्हणून काम करू दिले जाईल, याबद्दल तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
२०१३ मध्ये गुजरातचे पोलिस महासंचालक म्हणून जबाबदारी स्वीकारणारे ठाकूर यांना निवृत्त होण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, त्यापूर्वीच त्यांची दिल्लीला बदली करण्यात आली. पटेल समुदायाचे आरक्षण आंदोलन आणि कायदा व सुव्यवस्थेची स्थिती हाताळण्याच्या मुद्यावरून राज्य सरकार ठाकूर यांच्यावर नाराज असल्याचे समजते.