किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल=पंतप्रधानांचे टीकास्त्र=
कृष्णनगर, [१७ एप्रिल] – आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने नोटीस बजावल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजकीय पक्षांवर टीका न करता थेट निवडणूक आयोगालाच गंभीर परिणामांची धमकी दिली. विधानसभा निवडणुकीत पराभव स्पष्टपणे दिसू लागल्यानेच त्या अशा वागत आहेत, अशी प्रखर टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी येथे केली.
ममतांच्या तृणमूल कॉंगे्रसचा पराभव अटळ असल्याने त्या स्वत:चे भानही हरपून बसल्या आहेत. खरे तर, त्यांचा लढा राजकीय पक्षांसोबत आहे. पण, त्यांनी थेट आयोगाशीच लढण्याचे धोरण स्वीकारले आहे, असे नरेंद्र मोदी यांनी येथे प्रचंड गर्दीच्या निवडणूक सभेला संबोधित करताना सांगितले.
निवडणुका येतात आणि जातात, सरकारचेही तसेच आहे. पण, निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे आणि तिचे अस्तित्व नेहमीच कायम राहणार आहे. ज्याप्रमाणे कोणत्याही खेळात खेळाडूंना पंचांचा आदेश मानावा लागतो, तसेच निवडणुकीतही पंचांची भूमिका पार पाडणार्या निवडणूक आयोगाचा आदेशही बंधनकारक असतो. आयोगाच्या आदेशाचा सन्मान सर्वच राजकीय पक्षांनी करायला हवा. आयोगाने तुम्हाला कारणे दाखवा नोटीस जारी केल्यानंतर तुम्ही त्यांची भेट घेऊन आपली बाजू विशद करायला हवी होती. तसे न करता, मत मोजणीनंतर आयोगाला पाहून घेण्याची थेट धमकीच तुम्ही दिली. काही बघायचेच असेल, तर राज्यात सर्वत्र पसरलेले दारिद्र्य आणि नागरिकांना होत असलेला त्रास बघा व तो दूर करण्याचा प्रयत्न करा, असेही पंतप्रधान म्हणाले.