किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.29° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 43 %
वायू वेग : 4.06 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.94°से. - 28.21°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल23.88°से. - 28.16°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.85°से. - 28.29°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.36°से. - 26.86°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश23.11°से. - 27.74°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल23.04°से. - 26.29°से.
रविवार, 01 डिसेंबर टूटे हुए बादलकोलकाता, [१७ एप्रिल] – हिंसाचार, मतदान केंद्र बळकावणे आणि राजकीय संघर्ष अशा घटना घडत असतानाही पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यात आज रविवारी ७५ टक्के विक्रमी मतदान झाले.
अलिपूरदौर, जलपायगुडी, दार्जिलिंग, उत्तर दिनाजपूर, दक्षिण दिनाजपूर, मालदा आणि बिरभूम या सात जिल्ह्यांमधील एकूण ५६ जागांसाठी मतदान घेण्यात आले. ३३ महिलांसह ३८३ उमेदवार या टप्प्यात आपले भाग्य आजमावत असून, १.२ कोटी मतदार मतदानासाठी पात्र होते. त्यातील ७५ टक्के मतदारांनी आपला मताधिकार पार पाडला.
दरम्यान, काही मतदान केंद्रांवर मतपेट्या बळकावणे आणि बोगस मतदान करण्यासारख्या घटना घडल्या असल्याचा आरोप कॉंगे्रसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी केला आहे. मालदा येथे माकपा आणि तृणमूल कॉंगे्रस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार संघर्ष उडाला असून, यात दोन जण जखमी झाले. यामुळे येथील मतदान ४५ मिनिटांकरिता थांबविण्यात आले होते. केंद्रीय दले तैनात झाल्यानंतर पुन्हा मतदानाला सुरुवात झाली.