किमान तापमान : 24.29° से.
कमाल तापमान : 24.76° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 44 %
वायू वेग : 4.06 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.76° से.
23.91°से. - 28.21°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल23.88°से. - 28.16°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.85°से. - 28.29°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.36°से. - 26.86°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश23.11°से. - 27.74°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल23.04°से. - 26.29°से.
रविवार, 01 डिसेंबर टूटे हुए बादल=जनजीवनावर कुठलाही परिणाम नाही=
अहमदाबाद, [१८ एप्रिल] – ओबीसी कोट्यात आरक्षण मिळावे आणि देशद्रोहाचा आरोपी असलेल्या हार्दिक पटेलची मुक्तता करण्यात यावी, या मागणीसाठी पाटीदार समाजाने सोमवारी पुकारलेल्या गुजरात बंदचा अक्षरश: फज्जा उडाला. पटेलांचे प्राबल्य असलेला भाग वगळता, राज्यात अन्यत्र कुठेही बंदचा प्रभाव आढळून आला नाही. सामान्य जनजीवनावरही बंदचा कुठलाही परिणाम पडला नाही.
बंद असताना देखील प्रशासनाने हिंसाचाराच्या घटना घडलेल्या मेहसाणा येथील संचारबंदी आज सकाळी उठविली होती. विशेष म्हणजे, याच मेहसाणा शहरातून पाटीदार समाजाने बंदचे आवाहन केले होते. या शहरातही बंदचा फज्जा उडाल्याचे चित्र होते. शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक वाहतूक आणि रेल्वे सेवाही पूर्ववत सुरू होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अहमदाबाद, सुरत, राजकोट आणि मेहसाणा यासारख्या शहरांमध्ये अफवांवर आळा घालण्यासाठी मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. जमावबंदीचे आदेश आधीपासूनच जारी असल्याने कुठेही अनुचित घटना घडली नाही. मेहसाणा शहरातील ज्या भागांमध्ये पाटीदार समाजाचे प्राबल्य आहे, तो भाग वगळता अन्यत्र कुठेही जनजीवनावर परिणाम झाला नाही. याच शहरात रविवारी पाटीदार समाजाने आरक्षण आणि हार्दिक पटेलची मुक्तता या मागणीसाठी जेल भरो आंदोलन पुकारले होते. त्यानंतर संपूर्ण गुजरात बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. बंदच्या काळात कुठलीही अनुचित घटना घडायला नको यासाठी सरकारने कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. अनेक शहरांमध्ये संचारबंदीही लागू केली होती.