किमान तापमान : 26.99° से.
कमाल तापमान : 27.78° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 3.82 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.99°से. - 30.4°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.67°से. - 31.27°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.13°से. - 31.45°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.51°से. - 30.35°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.72°से. - 30.45°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.49°से. - 29.96°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश=केजरीवालांचा राजीनामा नामंजूर=
नवी दिल्ली, [४ मार्च] – आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे हुकूमशाहसारखे वागतात, असा जाहीर आरोप पक्षाचे वरिष्ठ नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी केल्यानंतर या दोघांची पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीतून (पीएसी) हकालपट्टी करण्यात आली आहे. योगेंद्र यादव यांचे प्रवक्तेपदही काढून घेण्यात आले. यामुळे या पक्षातील अंतर्गत कलह आता आणखीच पेटण्याची शक्यता आहे.
केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत यादव आणि प्रशांत भूषण यांच्याबाबत हा निर्णय घेण्यात आला. केजरीवाल यांनी पक्षाच्या संयोजकपदाचा राजीनामा दिला आहे, तोदेखील या बैठकीत मंजूर करण्यात आला का, असे विचारले असता पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने पत्रकारांना सांगितले की, त्यांचा राजीनामा आम्ही नामंजूर केला आहे.
बैठकीत अनेक नेत्यांनी योगेंद्र यादव यांच्यावर सडकून टीका केली. पक्षाशी संबंधित माहिती त्यांनी एका राष्ट्रीय दैनिकाला उपलब्ध करून दिली. त्यांचे हे वागणे पक्षविरोधी आहे, असे नेत्यांनी म्हटले आहे. तर, आपण आता पीएसीवर नसलो, तरी पक्षातून बाहेर पडणार नाही. पक्ष सांगेल ते काम करू. पक्ष मजबूत करण्यावरच आपला भर राहणार आहे, असे यादव आणि भूषण यांनी सांगितले. दरम्यान, प्रत्येकच पक्षात अशा घडामोडी होत असतात. या घटनांचा पक्षावर कुठलाही परिणाम होणार नाही आणि पक्षात फूटही पडणार नाही, असे पक्षनेते कुमार विश्वास यांनी स्पष्ट केले.
सततच्या खोकल्याने बेजार असलेले अरविंद केजरीवाल आजच्या बैठकीत सहभागी होऊ शकले नाही. निसर्गोपचारासाठी ते बंगळुरूला जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीतच ही बैठक घेण्यात आली.