किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.6° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.6° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, [२५ मार्च] – जम्मू-काशिमरात पीडीपी-भाजपाचे सरकार स्थापन होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या एकदोन दिवसात राज्यातील पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ‘तभा’ने आपल्या २८ फेब्रुवारीच्या अंकात ‘जम्मू-काश्मिरात लवकरच पीडीपी-भाजपा युतीचे सरकार’ अशी बातमी दिली होती. ती खरी ठरताना दिसत आहे.
पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती राजधानी दिल्लीत येऊन आधी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतील, त्यानंतर त्या पंतप्रधान मोदी यांनाही भेटतील, त्यानंतर राज्यात सरकार स्थापन होण्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील, असे तभाने आपल्या वृत्तात म्हटले होते. मार्चच्या दुसर्या आठवड्यापर्यंत राज्यात नवे सरकार स्थापन होईल, असे या वृत्तात नमूद होते, मात्र सरकार स्थापन व्हायला मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडला.
विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात मेहबुबा यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर पीडीपी आणि भाजपा यांच्यातील चर्चेत अद्याप प्रगती नाही, त्यामुळे राज्यात सरकार स्थापन होण्याची शक्यता मावळली, असे वातावरण तयार झाले होते. काही वृत्तपत्रांनी तशा बातम्याही दिल्या होत्या. मात्र, त्यावेळीही जम्मू-काश्मिरात लवकरच पीडपी-भाजपाचे सरकार स्थापन होईल या आपल्या माहितीवर आणि वृत्तावर ‘तभा’ ठाम होता.
राज्यात पीडीपी-भाजपा युतीचे सरकार स्थापन व्हावे, म्हणून भाजपा सरचिटणीस राम माधव यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या पुढाकाराला यश येत राज्यात पीडीपी-भाजपा युतीचे सरकार दुसर्यांदा सत्तारूढ होत आहे. राज्यातील पीडीपी-भाजपा युतीच्या दुसर्यांदा स्थापन होणार्या सरकारचे शिल्पकार म्हणून राम माधव यांचा उल्लेख करावा लागेल. १७ फेब्रुवारीला राम माधव यांनी श्रीनगरमध्ये जाऊन मेहबुबा मुफ्ती यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपासमोर अनेक अटी घालून गतिरोध निर्माण करण्याच्या मेहबुबा मुफ्ती यांच्या भूमिकेत बदल झाला आणि राजधानी दिल्लीत येऊन भाजपा नेत्यांना भेटण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती.
राज्यात पीडीपी-भाजपाचे सरकार स्थापन करण्यासाठी पीडीपी आमदारांचा मेहबुबा मुफ्ती यांच्यावर मोठा दबाव होता. ९ एप्रिलपर्यंत हे सरकार स्थापन झाले नसते, तर राज्याला पुन्हा निवडणुकांना सामोर जावे लागले असते. विशेष म्हणजे पीडीपीसह कोणत्याच पक्षाच्या आमदारांची दीड वर्षातच पुन्हा विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी नव्हती. त्यामुळे भाजपासोबत सरकार स्थापन करण्यासाठी मेहबुबा मुफ्ती यांच्यावर दबाव वाढत होता.
सरकार स्थापन करण्याबाबतचा निर्णय लवकर घेतला नाही तर आपल्या आमदारांना एकत्र ठेवणे मेहबुबा मुफ्ती यांना जड जात होते, त्यामुळे भाजपासोबत सरकार स्थापन करण्याशिवाय दुसरा पर्यायही त्यांच्यासमोर उरला नव्हता. त्यामुळे विनाअट त्यांनी भाजपासोबत सरकार स्थापन करण्याची तयारी दर्शवली आणि अडीच महिन्यापासून राज्यात सुरू असलेला राजकीय पेचप्रसंग संपुष्टात आला.