किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल=भाजपा नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट=
नवी दिल्ली, [२१ मार्च] – उत्तराखंडमधील राजकीय पेचप्रसंगाबाबत भाजपाच्या प्रतिनिधीमंडळाने आज सोमवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली व त्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली. कॉंग्रेसचे नेते मोतीलाल व्होरा आणि ए. के. ऍण्टोनी यांनीही राष्ट्रपतींची भेट घेतल्याचे वृत्त आहे.
विजय चौकातून भाजपाचे उत्तराखंडमधील खासदार आणि आमदार राष्ट्रपती भवनात गेले. विरोधी पक्षनेते अजय भट्ट आणि अन्य भाजपा नेत्यांनी या मार्चचे नेतृत्व केले. राज्यातील राजकीय घडामोडींची तसेच मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या बेकायदेशीर कारवायांची माहिती यावेळी राष्ट्रपतींना देण्यात आली.
उत्तराखंडमधील कॉंग्रेसच्या ९ आमदारांनी बंडखोरी करीत हरीश रावत सरकारचा पाठिंबा काढला. त्यामुळे राज्यातील कॉंग्रेसचे सरकार अल्पमतात आले आहे. ७० सदस्यांच्या विधानसभेत कॉंग्रेसचे ३६ आमदार होते, पण त्यातील ९ आमदारांनी पाठिंबा काढल्यामुळे कॉंग्रेसचे संख्याबळ २७ वर आले आहे. राज्यपाल के. के. पॉल यांनी रावत यांना २८ मार्चपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. कॉंग्रेसचे ९ बंडखोर आमदार राजधानी दिल्लीत डेरेदाखल झाले आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींचे केंद्रही दिल्लीत आले आहे.
राज्यातील कॉंग्रेस सरकार अल्पमतात आल्याचा आरोप करीत भाजपाने मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. कॉंग्रेसच्या बंडखोर आमदारांच्या मदतीने राज्यात सरकार स्थापण्याचा दावाही भाजपाने केला आहे. विशेष म्हणजे, भाजपा नेत्यांसोबत कॉंग्रेसचे बंडखोर आमदारही आज राष्ट्रपतींना भेटणार होते, मात्र ऐनवळी कॉंग्रेसचे बंडखोर आमदार राष्ट्रपतींना भेटायला गेले नाही.
राज्यपालांनी पाठविला अहवाल
राज्यातील ताज्या राजकीय घडामोडींबाबतचा आपला अहवाल राज्यपाल पॉल यांनी आज केंद्र सरकारकडे पाठवला. विनियोग विधेयकादरम्यान विधानसभेत झालेला गोंधळ आणि रात्री राजभवनात भाजप आणि कॉंग्रेसच्या आमदारांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनाचा या अहवालात उल्लेख आहे. सभागृहातील गोंधळाबाबतची सीडीही या अहवालासोबत पाठविण्यात आली आहे.