किमान तापमान : 27.99° से.
कमाल तापमान : 28.01° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 61 %
वायू वेग : 2.62 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
26.84°से. - 30.73°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर कुछ बादल25.83°से. - 29.83°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.69°से. - 29.54°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.67°से. - 29.57°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.71°से. - 29.35°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.65°से. - 28.47°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर कुछ बादल=साक्षीदाराने कोर्टात केली ओळखपरेड=
नवी दिल्ली, [११ सप्टेंबर] – १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर देशात उसळलेल्या दंगलींच्या काळात शिखांना ठार मारा, असे ओरडून सांगणारे आणि दंगलखोरांना प्रोत्साहित करणारे कॉंगे्रस नेते सज्जनकुमार हेच होते, असा दावा करीत एका साक्षीदाराने स्थानिक सीबीआय न्यायालयात सज्जनकुमार यांची ओळख पटविली आहे.
हजारो नागरिकांचे बळी घेणार्या या दंगलीतील प्रमुख साक्षीदारांपैकी एक असलेल्या शीला कौर यांनी न्या. कमलेश कुमार यांच्या न्यायालयात सांगितले की, आपण सज्जनकुमार यांनाच दंगलकाळात कॉंगे्रस कार्यकर्त्यांना शिखांच्या हत्येसाठी प्रोत्साहित करताना पाहिले होते. शिखांना सोडू नका, ठार मारा, असे ते वारंवार दंगलकर्त्यांना सांगत होते.
तो दिवस १ नोव्हेंबर १९८४ चा होता. नेमकी वेळ आता मला आठवत नाही. बाहेर बराच गोंधळ सुरू होता. लोक ओरडत होते, सैरावैरा पळत होते. मी घराच्या बाहेर आले. घरासमोरच असलेल्या बगिच्यात प्रचंड गर्दी होती. तिथे सज्जनकुमार गर्दीला संबोधित होते. ‘शिखांनी आपल्या मातेची हत्या केली आहे, आपण त्यांना जिवंत सोडता कामा नये’ असे ते गर्दीला सांगत होते आणि लोकही नारेबाजी करीत दंगली घडविण्यासाठी तयार झाले होते. एकही शीख नागरिक वाचायला नको, सर्वांना मारा, त्यांच्या घरांना आगी लावा, असे सज्जनकुमारांनी सांगितले. त्यानंतर काही वेळातच अनेक लोक माझ्या घरात शिरले आणि पती, सासरे व दिराची निर्घृणपणे हत्या केली, असे त्या म्हणाल्या.