किमान तापमान : 30.79° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 0.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.34°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशमुंबई, [१४ सप्टेंबर] – विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या विशेष बुद्धिमत्तेचे मापन करण्याच्या दृष्टिकोनातून शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात. त्यामुळे तीन विषयांचा शिष्यवृत्ती परीक्षेत समावेश असावा, असा आग्रह शिक्षक आणि पालकांकडून शालेय शिक्षण विभागाकडे केला जात होता. या मागणीबाबत आपली मते विभागाच्या संकेतस्थळावर नोंदवावीत, या मतांचा विचार करून शिक्षणतज्ज्ञांच्या मदतीने शिष्यवृत्ती परीक्षांची पुनर्मांडणी करण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
एप्रिल २०१० पासून राज्यात बालशिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली. या कायद्यानुसार शालेय स्तर रचनेत बदल झाले. इयत्ता पहिली ते पाचवी प्राथमिक स्तर, इयत्ता सहावी ते आठवी उच्च प्राथमिक स्तर, इयत्ता नववी ते १० वी माध्यमिक स्तर झाले आहेत, असे विनोद तावडे यांनी सांगितले. यानुसार इयत्ता ४ थी व ७ वी मध्ये होणार्या शिष्यवृत्ती परीक्षांचे निकष बदलणे क्रमप्राप्त होते. परंतु, हा निर्णय अनेक वर्षे प्रलंबित होता. २९ जून २०१५ रोजी शासनाने शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी व इयत्ता ८वी मध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. साधारणतः ८-१० वर्षांपूर्वी शिष्यवृत्ती परीक्षेतील विषयांमध्ये फेरफार झाले. गणित, प्रथम भाषा, बुद्धिमत्ता या तीन प्रमुख विषयांमध्ये इतिहास, भूगोल, विज्ञान, इंग्रजी या विषयांचा समावेश केला होता. त्यामुळे आता शिक्षणतज्ज्ञांच्या मदतीने शिष्यवृत्ती परीक्षांची पुनर्मांडणी करण्यात येईल, असेही तावडे यांनी सांगितले.