किमान तापमान : 30.02° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 2.46 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.48°से. - 31.19°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल26.76°से. - 31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.88°से. - 29.76°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.49°से. - 30.23°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.3°से. - 30.25°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.38°से. - 29.76°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादलनवी दिल्ली, [२२ जानेवारी] – अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचे संस्थापक व ज्येष्ठ विधिज्ञ शांतिभूषण यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांचे तोंड भरून कौतुक केले असून, हा भाजपाचा मास्टरस्ट्रोक असल्याचे वक्तव्य केल्यामुळे राजधानीच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. हा आमच्या पक्षात अंतर्गत लोकशाही असल्याचा पुरावा असल्याचा दावा करून शांतिभूषण यांचे हे वैयक्तिक मत असल्याचे आपने म्हटले आहे. भूषण यांच्या या वक्तव्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात आपला जोरदार झटका बसला आहे.
जर किरण बेदी दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना निश्चितच आनंद होईल, असे माजी केंद्रीय विधी मंत्री व प्रख्यात विधिज्ञ असलेल्या शांतिभूषण यांनी सध्याच्या घडामोडींवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. अण्णा हजारे यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात किरण बेदी यांचे मोलाचे योगदान होते, असेही भूषण यांनी म्हटले आहे.
किरण बेदी यांनी पक्षात केलेला प्रवेश हा निश्चितच भाजपाचा मास्टरस्ट्रोक आहे. किरण बेदी यांना पक्षात आणून त्यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करणे हा माझ्या दृष्टीने मास्टरस्ट्रोक आहे. अण्णा आंदोलनात बेदी अरविंद केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांच्यासोबत होत्या आणि त्यांचे योगदान विसरता येणार नाही. मुख्यमंत्री झाल्यास किरण बेदी स्वच्छ, पारदर्शी आणि कार्यक्षम प्रशासन देऊ शकतील, असेही भूषण यांनी सांगितले. भूषण यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी नकार दिला आणि फक्त भूषण यांना धन्यवाद दिले.
शांतिभूषण यांनी आम आदमी पक्षाच्या कार्यपद्धतीवरही जोरदार टीका केली. आप हा पक्ष ज्या तत्त्वांसाठी स्थापन करण्यात आला होता त्यापासून तो भरकटला असून, या पक्षाच्या फेरबांधणीची गरज आहे. आपमध्ये सर्वकाही सुरळीत आहे, असे मला वाटत नाही आणि पक्षाचा कारभार अपेक्षित तत्त्वानुसार चालताना दिसत नाही, असेही भूषण यांनी सांगितले. शांतिभूषण हे अण्णा आंदोलनातील अग्रणी, आम आदमी पक्षाच्या संस्थापक सदस्यांमध्ये सर्वात ज्येष्ठ आणि पक्षाचे सर्वात मोठे देणगीदार आहेत, हे याठिकाणी उल्लेखनीय.