किमान तापमान : 29.67° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 2.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.78°से. - 30.99°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.32°से. - 30.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.51°से. - 29.25°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.09°से. - 29.82°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.89°से. - 29.89°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 29.34°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल=हजारावर अर्ज दाखल=
नवी दिल्ली, [२१ जानेवारी] – दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आज बुधवारी शेवटच्या दिवशी भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी, आपचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि कॉंग्रेस नेते अजय माकन यांच्यासह ५०० पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले. यामुळे ७० सदस्यीय दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार्यांची संख्या एक हजारावर गेली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने सर्वच पक्षांच्या प्रमुख उमेदवारांनी बुधवारी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. शेवटच्या दिवशी अर्ज भरणार्या उमेदवारांमध्ये भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी, आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल, कॉंग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, कॉंग्रेसमधून भाजपात आलेल्या माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तीरथ, भाजपाचे ज्येष्ठ नेते जगदीश मुखी यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. १४ जानेवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली. उद्या गुरुवार २२ जानेवारीला उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार असून, २४ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. ७ फेब्रुवारीला मतदान होणार असून, १० फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी कृष्णानगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बेदी हजारो कार्यकर्त्यांसह मिरवणुकीने आल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन, खा. विजय गोयल, खा. महेश गिरी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. किरण बेदी यांनी अर्ज भरण्यापूर्वी लाजपतनगर परिसरात लाला लजपतराय यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. कृष्णानगर हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन १९९३ पासून २०१३ पर्यंत सलग पाचवेळा निवडून आले होते.
नवी दिल्ली मतदारसंघातून आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनीही आपला उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरायला केजरीवाल मिरवणुकीने आले होते. केजरीवाल मंगळवारीच अर्ज भरणार होते. मात्र, प्रचंड गर्दीमुळे केजरीवाल वेळेवर कार्यालयात पोहोचू शकले नव्हते. कॉंग्रेसचे अजय माकन यांनी सदर बाजार मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरायला माकनही मिरवणुकीने आले होते. जनकपुरी मतदारसंघातून भाजपाचे ज्येष्ठ नेते जगदीश मुखी यांनी अर्ज भरला. त्यांचा मुकाबला त्यांच्या जावयाशी म्हणजे कॉंग्रेस उमेदवार सुरेशकुमार यांच्याशी आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यासोबतच सर्व उमेदवारांनी एक प्रतिज्ञापत्र सादर करून आपली संपत्ती जाहीर केली. संपत्तीच्या बाबतीत भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी केजरीवाल यांच्यावर मात केली. किरण बेदी यांच्याकडे ३ कोटी १४ लाखाची संपत्ती आहे. त्या तुलनेत केजरीवाल यांच्याकडे १ कोटी ९२ लाखाची संपत्ती आहे. विशेष म्हणजे केजरीवाल यांची संपत्ती मागील निवडणुकीपेक्षा २ लाखाने कमी झाली आहे. केजरीवाल यांच्याकडे २ लाख २६ हजारांची रोख रक्कम आहे. इंदिरापूरम भागात त्यांचा ५५ लाख रुपये किंमतीचा एक फ्लॅट आहे. केजरीवाल यांच्यावर १० गुन्हेही दाखल आहेत.