किमान तापमान : 23.77° से.
कमाल तापमान : 23.92° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 43 %
वायू वेग : 4.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.92° से.
23.84°से. - 28.49°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.46°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.66°से. - 28.57°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.19°से. - 28.07°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर छितरे हुए बादल22.54°से. - 28.07°से.
रविवार, 01 डिसेंबर कुछ बादल22.51°से. - 26.58°से.
सोमवार, 02 डिसेंबर टूटे हुए बादल=शेतकर्यांच्या उसाला रास्त, किफायतशीर भाव न देणार्या कारखान्यांवर जप्ती=
मुंबई, [२ मे] – शेतकर्यांना एफआरपी न देणार्या २० साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय साखर आयुक्तांनी घेतला आहे. तसेच सहा साखर कारखान्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णयही आयुक्तांनी घेतला आहे. या संदर्भातील वृत्त एका खाजगी वृत्तवाहिनीने दिले आहे. या कारवाईमुळे साखर कारखानदारांमध्ये खळबळ उडाली असून सरकारने हा निर्णय मागे घ्यावा म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू होते. शेतकर्यांचे हित लक्षात घेऊन अवसायनात जाणार्या साखर कारखान्यांना मोठे पॅकेज देऊन या कारखान्यांना ऊर्जीतावस्थेत आणण्याचा सहकार खात्याचा प्रयत्न होता. यादृष्टीने साखर कारखानदारांनी प्रयत्न करून कारखान्याची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र, शेतकर्यांच्या उसाला रास्त आणि किफायतशीर भाव (एफआरपी) न देणार्या २० साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय साखर आयुक्तांनी घेतल्याची माहिती आहे.