किमान तापमान : 25.49° से.
कमाल तापमान : 26.49° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 43 %
वायू वेग : 3.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.49° से.
23.94°से. - 28.14°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.05°से. - 28.38°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.28°से. - 28.24°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.41°से. - 27.68°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.18°से. - 27.95°से.
रविवार, 01 डिसेंबर कुछ बादल23.02°से. - 26.24°से.
सोमवार, 02 डिसेंबर टूटे हुए बादलनवी दिल्ली, [२ मे] – देशातील सर्वांत मोठे राज्य असलेल्या आणि केंद्रातील सत्तेची किल्ली म्हणून ओळख असलेल्या उत्तरप्रदेशात पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कॉंग्रेसने कंबर कसली आहे. यावेळी कॉंग्रेसने उपाध्यक्ष राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी वढेरा यांच्यापैकी एकाला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणूनही जाहीर करण्याची व्यूहरचना तयार केल्याचे वृत्त आहे.
या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष पूर्ण ताकदीने तयारीला लागले आहेत. कॉंग्रेस पक्षही याला अपवाद नाही. राज्यात गेल्या काही वर्षांपासून होत असलेली पिछेहाट रोखण्यासाठीच कॉंगे्रसने राहुल किंव प्रियंकाला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून समोर आणण्याचा निर्णय घेतला आहे, असे सूत्राने सांगितले.
प्रियंका गांधी उत्तरप्रदेशमधून निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याची शक्यता आहे. प्रियंका याच राज्यात पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारही असतील. त्यांच्यासोबतच, राहुल गांधी यांच्या नावाचाही विचार केला जात आहे. १९ मे नंतर याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे, असल्याचे सूत्राचे मत आहे.
प्रियंका गांधी कॉंग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार घोषित झाल्या तर, निवडणुकीला वेगळे महत्त्व प्राप्त होणार आहे. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या कॉंगे्रसला पुनरुज्जीवन मिळावे, यासाठी प्रियंकांनी राजकारणात सक्रिय व्हावे, अशी मागणी देशभरातील कॉंगे्रसचे नेते व कार्यकर्ते करीत आहेत, हे विशेष!
… तर ब्राह्मण उमेदवार
प्रियंका गांधी किंवा राहुल गांधी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदावारीसाठी तयार झाले नाही, तर एखाद्या ब्राह्मण उमेदवाराला या पदासाठी समोर केले जाण्याची शक्यता आहे. निवडणुका जिंकण्याच्या उद्देशाने उत्तरप्रदेश कॉंग्रेसमध्ये काही महत्त्वाचे बदलही केले जाणार असल्याचे सूत्राचे मत आहे.
कल्पना नाही
राजकीय व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांनी आगामी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून आपले नाव पुढे करण्याच्या प्रस्तावाबाबत काहीही कल्पना नसल्याचे राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ‘याबाबत मला काहीच कल्पना नाही. तुम्हीच वृत्त चालविता’, असे राहुल गांधी यांनी यासंबंधीच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.