किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.6° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.6° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल=मृत्युपूर्वी लिहिलेल्या पत्राद्वारे केला खुलासा=
हैदराबाद, [१९ जानेवारी] – संशोधन विषयाचा विद्यार्थी असलेला रोहित वेमुला याने हैदराबाद विद्यापीठातील आवारात असलेल्या वसतिगृहातील एका खोलीत रविवारी रात्री आत्महत्या केली. आपल्या मृत्यूपूर्वी त्याने पत्र लिहून आपली मनःस्थिती विशद केली. त्याचा हा सारांश..
‘जर तू, जो कोणी माझे पत्र वाचत आहे, माझ्यासाठी काही करू इच्छित असाल, तर माझी सात महिन्यांपासून थकलेली १ लाख ७५ हजारांची शिष्यवृत्ती मला मिळवून दे .. माझ्या पश्चात माझ्या कुटुंबियांना तरी ती मिळेल याची तजवीज कर. मला रामजीला ४० हजार रुपये देणे आहेत, त्याने त्यासंबंधी माझ्याकडे कधीही तगादा लावलेला नाही. पण कृपया त्या रकमेतून रामजीचेही पैसे देऊन टाक…
मला माहीत आहे की, तुमच्यापैकी काहींना माझी खरच काळजी आहे, अनेकांनी माझ्यावर माया केली आणि मला अत्यंत चांगली वागणूक दिली. माझी कोणाविषयी काहीही तक्रार नाही. मलाच माझ्याबद्दल अनेक तक्रारी होत्या. माझ्या मनात आणि माझ्या शरीरात निर्माण होत असलेली दरी मला जाणवू लागली आणि माझ्यातील राक्षस बाहेर आला.
मला नेहमीच लेखक व्हायचे होते… कार्ल सागान यांच्याप्रमाणे विज्ञान लेखक होण्याचे माझे स्वप्न होते. मात्र प्रत्यक्षात निदान हे एक पत्रतरी मी लिहू शकलो…’
अशा ह्रदय पिळवटून टाकणार्या शब्दांत रोहितने अखेरचे पत्र लिहिले. तसेच या पत्रात त्याने त्याच्या मित्राची, ज्याची खोली त्याने आत्महत्येसाठी वापरली त्याचीही माफी मागितली.
रोहितच्या निलंबनाविषयी प्रशासनाने कळवले नाही – आई राधिका
गुंटूरमध्ये शिवणकाम करून पैसे जोडत आपल्या मुलाच्या, रोहितच्या शिक्षणासाठी धडपडत असलेली त्याची आई राधिका यांनीही अत्यंत शोकाकूल मनःस्थितीत आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘ रोहितच्या निलंबनाविषयी आपल्याला कॉलेज प्रशासनाने कळवण्याची तसदीही घेतली नाही, माझा मुलगा, जो पुढल्या वर्षी माझ्या हाताशी येईल, कुठेतरी चांगली नोकरी मिळवेल अशी माझी आशा होती, तो तब्बल १३ दिवस बेवारशासारखा फिरत होता.. रोहितने काय चूक केली होती, याचे उत्तर मला कुलगुरूंनी द्यावे.’
राहुल गांधींनी दिली घटनास्थळी भेट
दरम्यान कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही घटनास्थळाला भेट दिली. रोहितच्या आत्महत्येबाबत केंद्र सरकारला दोषी ठरवत, त्यांनी केंद्रातील काही मंत्र्यांच्या दबावामुळेच कुलगुरूंनी याप्रकरणी कुठलीही कारवाई केली नसल्याचा आरोप केला. तसेच कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी केली.