किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 44 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– गोंडवाना विद्यापीठाच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन शिबिराचे उद्घाटन,
गडचिरोली, (२५ डिसेंबर) – विद्यार्थ्यांमध्ये समाजाला घडवण्याची क्षमता आणि आपत्तींसारख्या देशासमोरील प्रत्येक आव्हानाशी लढण्याची हिंमत असण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, प्रत्येक आपत्तीतून भारत सुरक्षित आणि विकसित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. आव्हान शिबिरात विद्यार्थ्यांनी पूर्ण समर्पणाने सहभागी व्हावे असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या रासेयो विभागाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी आभासी पद्धतीने अध्यस्थानावरून केले.
यावेळी खासदार अशोक नेते, पोलिस अधीक्षक निलोत्पल, कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, आमदार कृष्णा गजबे, जळगाव विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील, समादेशक राष्ट्रीय आपदा मोचनबल प्रवीण धट, एनडीआरएफचे सिनिअर इन्स्पेक्टर कृपाल मुळे, अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान डॉ. अनिल चिताडे, अधिष्ठाता मानव विज्ञान विद्याशाखा डॉ. चंद्रमौली, गोंडवाना विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ. श्याम खंडारे, कोल्हापूर विद्यापीठाचे रासेयो संचालक तानाजी चौगुले, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य गुरुदास कामडी, प्रशांत मोहिते, प्रा. डॉ. विवेक जोशी, गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा संचालक डॉ. दिनेश नरोटे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, गेल्या काही वर्षांत, भारताने आपत्तींना प्रतिसाद देण्यामध्ये, विशेषत: आपत्तीपूर्व शमनामध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. सरकार सर्व प्रकारच्या आपत्तींना तोंड देण्यासाठी सज्ज आहे. आपत्ती व्यवस्थापनात विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. विद्यार्थी आपत्तीबाबत जागरूकता पसरविण्यात मदत करू शकतात. आपत्तीसाठी तयार राहण्याच्या महत्त्वाबद्दल ते त्यांचे मित्र, कुटुंब आणि समुदाय सदस्यांना महत्त्वाचे संदेश देऊ शकतात.
सामूहिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांमध्ये स्वभावाने मोठे धैर्य आणि तग धरण्याची क्षमता असते. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे समाजाला मोठ्या गरजेच्या वेळी खूप मदत होते. विद्यार्थ्यांना योग्यप्रकारे प्रशिक्षण दिल्यास ते आपत्तीस्थळी पोहोचू शकतात आणि पूर, भूकंप, दुष्काळ वेळी आपत्ती व्यवस्थापन पथकाला त्वरित पुनर्वसनासाठी मदत करू शकतात. हे लक्षात घेऊन कुलपती कार्यालयाने सुरू केलेल्या कार्यक्रमांच्या मालिकेत ‘आव्हान’ हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम म्हणून पुढे आला आहे. मी गोंडवाना विद्यापीठ आणि सर्व सहभागी राष्ट्रीय स्वयंसेवक आणि कार्यक्रम अधिकारी यांचे अभिनंदन करतो. कारण त्यांनी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर सुरू केले आणि त्यांना त्यांच्या प्रयत्नांमध्ये यश मिळावे, असेही ते म्हणाले.
खासदार अशोक नेते म्हणाले, विद्यापीठाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर आयोजित केले त्यासाठी मी विद्यापीठाचे अभिनंदन करतो व अशा प्रकारच्या शिबिरामुळे येथील विद्यार्थ्यांना फायदा होईल. जिल्ह्यात दरवर्षी येणार्या पूर परिस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांना सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी सहभागी होता येईल असे ते म्हणाले. या प्रसंगी पोलीस अधिक्षक निलोत्पल म्हणाले, विद्यापीठाने अत्यंत चांगल्या प्रकारे ’आव्हान’ चे आयोजन केल्याबद्दल अभिनंदन केले.
आमदार कृष्णा गजबे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक हा महत्वाचा दुवा आहे. राष्ट्र उभारणीसाठी राष्ट्रीय सेवा योजनेने नेहमी पुढाकार घेत आपले सर्व कौशल्य वापरून लोकांचे जीव वाचवावे ही रासेयोच्या ‘आव्हान’ ची संकल्पना असल्याचे ते म्हणाले. कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले, आपदा प्रबंधनाचे प्रमुख कारण हे मानवनिर्मित असते. याचा नीट मुकाबला करण्यासाठी सुद्धा प्रशिक्षण देण्याची गरज असते. आपदा प्रबंधनाचे धडे हे सामान्य नागरिकांना दिले तर जीवित आणि वित्त होणार नाही. दहा दिवस होणार्या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांनी चांगला उपयोग करून घ्यायचा आहे. यातून प्रशिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांची यादी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनासाठी त्यांच्या जिल्ह्यात पाठवण्यात येणार आहे. राजभावन कार्यालयाकडून अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रीय आपदा मोचनबलाचे सहाय्यक समादेशक प्रवीण धट यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. श्याम खंडारे यांनी केले. संचालन डॉ. शिल्पा आठवले यांनी तर आभार कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सह समन्वयक डॉ. प्रिया गेडाम यांच्यासह विद्यापीठातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.