किमान तापमान : 27.87° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.54 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.87°से. - 30.57°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.82°से. - 30.41°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.75°से. - 30.46°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 31.02°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 30.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.49°से. - 30.08°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश– राहुल नार्वेकर यांचा संजय राऊतांना टोला,
सिंधुदुर्ग, (२७ नोव्हेंबर) – सरकारने बहुमताचा जादुई आकडा सभागृहात पार केला आहे. सरकार पडायचे असते, तर सभागृहातील संख्याबळावर पडले असते, त्यामुळे उगाच कुणीतरी सरकार पडणार, अशी भाषा करू नये, असा टोला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी खासदार संजय राऊतांना लगावला. आमदार अपात्रतेबाबत योग्य वेळेत निर्णय घेणार असून, विधानसभेच्या नियमांची पायमल्ली होऊ देणार नाही, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
सभागृहात अविश्वास ठराव आल्यानंतर संख्याबळ कमी असल्यास सरकार पडते. बाहेर कुणी काहीतरी बोलते म्हणून सरकार पडत नाही. या सरकारने बहुमताचा जादुई आकडा सभागृहात पार केला आहे, असे नार्वेकर म्हणाले. आमदार अपात्रत्रेबाबत वेळेतच निर्णय होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने जी कालमर्यादा दिली आहे, त्यानुसार वेळेत निर्णय द्यायचा माझा विचार आहे. कोणत्याही नैसर्गिक न्याय तत्त्वाला धक्का पोहोचणार नाही. विधानसभेच्या नियमांची पायमल्ली होऊ देणार नाही, असे नार्वेकर म्हणाले.
पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन झाले आहे की नाही, याचा निर्णय आदित्य ठाकरेंनी नव्हे, विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा आहे. त्यामुळे उगाच पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे वक्तव्य आदित्य ठाकरेंनी करू नये. या कायद्याचे उल्लंघन झाले असेल, तर निश्चितच विधानसभा अध्यक्ष म्हणून मी निर्णय घेईल, असे नार्वेकर म्हणाले.
स्थानिक स्वराज्य लांबणीवर
स्थानिक स्वराज्य निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. या संदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सरकारने या निवडणुका लवकर व्हाव्या, असे सांगितले आहे. परंतु, याचा निकाल न लागल्यामुळे या निवडणुका घेता येत नाही, असे नार्वेकर म्हणाले.