किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल-विधानसभेत नीतेश राणेंचा खळबळजनक आरोप,
नागपूर, (१५ डिसेंबर) – मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिमचा राईट हॅण्ड सलीम कुत्ता हा पॅरोलवर असून, या अंडरवर्ल्ड डॉन सलीम कुत्तासोबत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी डान्स पार्टी केली, असा खळबळजनक आरोप आ. नीतेश राणे यांनी आज विधानसभेत केला. दाऊद गँगचा शार्प शूटर सलीम कुत्तासोबत पार्टी करतानाचा शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
भाजपा आमदार नीतेश राणे विधानसभेत बोलताना म्हणाले, १९९३ साली मुंबई बॉम्बस्फोटाची घटना घडली. यात दुर्घटनेत २५७ लोकांचा जीव गेला होता, तर ७०० लोक जखमी झाले होते. दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता हा पॅरोलवर आहे. शेवटच्या दिवशी त्याने नाशिकमध्ये पार्टी दिली. या पार्टीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर सहभागी झाले आहे. कुत्तासोबत बडगुजर नृत्यावर थिरकले. पार्टीचा व्हिडीओ आ. राणे यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. नीतेश राणे यांच्या गंभीर आरोपांनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे.
सलीम कुत्ता मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य आरोपी आहे. तो पॅरोलवर बाहेर असताना त्याने एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत सुधाकर बडगुजर हे देखील सहभागी झाले होते. यावरून नीतेश राणे यांनी गंभीर आरोप केले आणि ठाकरे गटाला घेरण्याचा प्रयत्न केला. नीतेश राणे यांनी अंडरवर्ल्ड डॉन सलीम कुत्तासोबत सुधाकर बडगुजर यांचे संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर नाशिक पोलिस सतर्क झाले आहेत.
बडगुजर छोटा मासा : दादा भुसे
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे म्हणाले, नीतेश राणे यांच्या आरोपाची गंभीर दखल घेतली पाहिजे. अतिरेक्यांना पैसा कोण पुरवतो, याचे लागेबांधे कुणाशी आहेत, बडगुजर एक छोटा मासा आहे, त्याच्यावर कुणाचा वरदहस्त आहे, याची खोलात जाऊन चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.
एसआयटीमार्फत तपास करून कारवाई करू : फडणवीस
सलीम कुत्ता हा पॅरोलवर बाहेर होता. त्याला पार्टी करण्याची परवानगी नाही. त्यामुळे त्याने पार्टी करायची आणि तिथे कुणीतरी जाऊन त्या पार्टीत नाचायचे, हे अतिशय गंभीर आहे. कुत्ताशी या व्यक्तीचा काय संबंध आहे, हे तपासण्यात येईल. पार्टीत कोण कोण सहभागी होते, त्या सर्वांची एसआयटीमार्फत चौकशी होईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.