किमान तापमान : 23.32° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादल– मुख्यमंत्र्यांनी केली हवाई रुग्णवाहिकेची व्यवस्था,
जळगाव, (०५ नोव्हेंबर) – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांना रविवारी दुपारी हृयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळाली आहे. एकनाथ खडसेंची मुलगी रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून ही माहिती दिली. त्यानंतर शिंदे यांनी तातडीने हवाई रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. एकनाथ खडसेंना हवाई रुग्णवाहिकेच्या मदतीने उपचारासाठी जळगावहून मुंबईला नेण्यात येणार आहे.
एकनाथ खडसेंना अचानक छातीमध्ये दुखू लागले होते. त्यानंतर त्यांना जळगावच्या गजानन रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर एकनाथ खडसेंना सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचे कळले. त्यामुळे खडसेंना पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी घेतला. त्यासाठी खडसेंच्या मुलीनी शिंदे यांना फोन केल्यानंतर त्यांनी हवाई रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. सध्या एकनाथ शिंदे साता-यातील त्यांच्या दरे या गावी आहेत. त्यांना खडसेंच्या प्रकृतीची माहिती मिळल्यानंतर हवाई रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याचा आदेश दिला.