किमान तापमान : 26.17° से.
कमाल तापमान : 27.38° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 2.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.38° से.
23.68°से. - 28.61°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर कुछ बादल24.11°से. - 28.99°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.75°से. - 28.8°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल24.78°से. - 28.5°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर कुछ बादल25.03°से. - 28.91°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.82°से. - 29.26°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादलपुणे, (२८ ऑगस्ट) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात बारावीचा निकाल ३२.१३ टक्के तर, दहावीचा निकाल २९.८६ टक्के लागला. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अनुराधा ओक यांनी निकालाची माहिती दिली. राज्य मंडळाने जुलै-ऑगस्टमध्ये दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा घेतली होती.
बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ७० हजार २०५ विद्यार्थ्यांपैकी ६८ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यातील २२ हजार १४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात विज्ञान शाखेतील १४ हजार ६३२, कला शाखेतील ४ हजार १४६, वाणिज्य शाखेतील ३ हजार २८, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या २८६ आणि आयटीआयच्या ५२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बारावीच्या गेल्यावर्षीच्या पुरवणी परीक्षेच्या तुलनेत यंदा निकालात किंचिट घट झाली. गेल्यावर्षी ३२.२७ टक्के निकाल लागला होता. दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ४९ हजार ३७७ विद्यार्थ्यांपैकी ४५ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १३ हजार ४८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्यावर्षी दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल ३२.२७ टक्के लागला होता. त्या तुलनेत यंदा निकालात घट झाल्याचे दिसून येते.
परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी-बारावीच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा १ ते २२ मार्च या कालावधीत होणार आहे. विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.