किमान तापमान : 26.96° से.
कमाल तापमान : 30.31° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 43 %
वायू वेग : 5.33 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.31° से.
23.94°से. - 31.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.38°से. - 28.63°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.28°से. - 29.45°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.43°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.15°से. - 28.01°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.72°से. - 27.96°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलजळगाव, (२८ ऑगस्ट) – राज्यात जवळपास संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. मराठवाड्यासह राज्यात बहुतांश ठिकाणी पिण्याच्या पाण्याचीही समस्या निर्माण होताना दिसत आहे. आणखी काही दिवस पाऊस आला नाही तर, काही भागात कृत्रिम पावसाचा पर्याय पडताळून पाहावा लागेल, असे स्पष्ट संकेत पाणीपुरवठा आणि जलसंधारण मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत.
राज्याच्या अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत असून, अनेक पिकांना धोका पोहोचण्याची शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पडण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. पोषक वातावरण असल्यावर कृत्रिम पावसाबाबत शास्त्रज्ञांशी चर्चा सुरू असून, त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल. जळगाव जिल्ह्यात पुरेसा पाऊस न पडल्यामुळे काही गावांमध्ये पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी टँकरही सुरू करण्यात आले आहेत तर, भविष्यातील परिस्थिती लक्षात घेता विहिरी अधिकृत करण्यासह विविध उपाययोजना सुद्धा करण्यात येत आहे.
कृत्रिम पाऊस पाडताना पोषक वातावरण असावे लागते. तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून पोषक वातावरण असल्यावर कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशीही माहिती पाटील यांनी दिली.