किमान तापमान : 26.6° से.
कमाल तापमान : 28.19° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 4.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.19° से.
23.94°से. - 28.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.34°से. - 28.79°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.11°से. - 29.17°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 29.06°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.74°से. - 28.87°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.62°से. - 28.2°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादल– देवेंद्र फडणवीसांची ग्वाही, सादर केली दुष्काळमुक्तीची योजना,
परभणी, (२७ ऑगस्ट) – पावसाचे वाहून जाणारे पाणी मराठवाड्यातील गोदावरी खोर्यात आणायचे आहे. त्या आधारे मराठवाड्यातील मागील पिढीने पाहिलेला दुष्काळ पुढील पिढीला पाहू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिली. येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात ते बोलत होते.
काही भागांत पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मराठवाड्यात प्रत्येक चार वर्षांनी दुष्काळाचा सामना करावा लागतो. २०१४ मध्ये ५३ टक्के पाऊस होता. २०१८ मध्ये ६४ टक्के पाऊस होता. आता देखील ५० टक्क्यांच्या जवळपास पाऊस पडला आहे. त्यामुळे मराठवाड्याला कायमचे दुष्काळमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न असून, त्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यासाठी काही उपयोजना केल्या आहेत. या अंतर्गत मराठवाडा ग्रीड योजना आणली. मराठवाड्यातील धरणे एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. एखाद्या भागात पाऊस जास्त झाल्यास तिथून दुसर्या ठिकाणी पाणी नेण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले.
मागील अडीच वर्षांत या कामांना ब्रेक लागला होता. आता पुन्हा आम्ही हे काम सुरू केले आहे. मराठवाडा ग्रीड योजनेसाठी आपण केंद्राकडे निधीची मागणी केली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी तो देतील, अशी अपेक्षा आहे. पश्चिमी वाहिन्यांचे वाहून जाणारे पाणी आपण गोदावरी खोर्यात आणण्याची योजना आणली. मात्र, मागील अडीच वर्षांत यावर काम झाले नाही. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात या कामालाही आपण गती देणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
महिलांसाठी लवकरच मोठा निर्णय घेणार
राज्य सरकार महिलांच्या संदर्भात मोठा निर्णय घेणार आहे. महिला बचत गटांना मुख्यमंत्री एवढे बळ देतील की, महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतील. ओबीसींसाठी १० लाख घरे बांधणार आहोत. देशातील एकही व्यक्ती बेघर नसावी, असे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न आहे. ते आपण पूर्ण करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.