किमान तापमान : 26.31° से.
कमाल तापमान : 26.94° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 62 %
वायू वेग : 4.87 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.31° से.
25.99°से. - 31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.73°से. - 29.76°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.81°से. - 29.63°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.85°से. - 29.57°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.84°से. - 29.35°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश25.78°से. - 28.96°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल-गुन्हे लपविले नसल्याच्या निरीक्षणाची नोंद,
नागपूर, (०९ सप्टेंबर) – भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध २०१४ च्या विधानसभा निवडणूक शपथपत्रात गुन्ह्याची माहिती लपवल्याचा कथित आरोप असलेल्या खटल्यात प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी संग्राम जाधव यांनी आज अंतिम निकाल घोषित करीत देवेंद्र फडणवीस यांना निर्दोष मुक्त केले आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार फडणवीस यांच्यावरील दोन्ही गुन्हे निवडणूक प्रभावित करणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी मुद्दाम गुन्हे लपवले ही बाब सिद्ध होत नसल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे.
फडणवीस यांनी २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपवली, असा आरोप ईडी प्रकरणातील आरोपी अॅड. सतीश उके यांनी केला होता. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करून खटला चालविण्यात यावा, अशी तक्रारही त्यांनी प्रथम श्रेणी न्यायालयाकडे केली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी खटला चालविण्यात यावा, असे आदेश दिले होते. त्यानंतर प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात याप्रकरणी खटला सुरू झाला. कायदेशीर प्रक्रीयेनुसार आरोपीला न्यायालयात बयाणासाठी उपस्थित राहावे लागते. त्यानुसार, एप्रिल महिन्यात फडणवीस हे प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकार्यांसमक्ष उपस्थितही झाले होते. पुढे झालेल्या सुनावण्यांमध्ये उके यांचा युक्तिवाद पूर्ण झाला होता.फडणवीस यांच्याकडून निवडणूक शपथपत्रात माहिती देताना गुन्हे जाणीवपूर्वक लपविण्यात आले नाहीत. ते नजरचुकीने झाले. किंबहुना त्याहून अधिक गंभीर स्वरुपाचे गुन्हे तेव्हा त्यांच्यावर दाखल होते व त्यांची माहिती त्यांनी दिली होती. तसेच या दोन पैकी एक गुन्ह्यातून त्यांची मुक्तता झाली असून एका गुन्ह्यात फिर्यादीने तक्रार मागे घेतली आहे, असा युक्तिवाद फडणवीस यांच्या वकिलांनी केला. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून या प्रकरणाचा निकाल राखीव ठेवत शुक्रवारी अंतिम निकाल देत देवेंद्र फडणवीस यांना दोषमुक्त केल्याचा निकाल जाहीर केला.या सुनावणीत फडणवीस यांच्यातर्फे वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी यांनी युक्तिवाद केला. त्यांना अॅड. देवेंद्र चौहान आणि अॅड. उदय डबले यांनी सहकार्य केले.