किमान तापमान : 26.99° से.
कमाल तापमान : 27.17° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.9°से. - 30.73°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर कुछ बादल25.83°से. - 29.83°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.69°से. - 29.54°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.67°से. - 29.57°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.71°से. - 29.35°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.65°से. - 28.47°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर कुछ बादल– कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट,
मुंबई, (०९ सप्टेंबर) – संपूर्ण ऑगस्ट महिना जवळजवळ कोरडा गेल्यानंतर राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. सप्टेंबरच्या उर्वरित काळात राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती हवामान खात्याने शनिवारी दिली.
गुरुवारपासून मान्सून राज्यात सक्रिय झाला. कोकण, मराठवाडा आणि विदर्भासह बहुतांश भागांमध्ये कोसळत आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे. कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दोन दिवस कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस कोसळेल. मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भासाठी यलो अलर्ट
विदर्भाला आज हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात आज जोरदार पाऊस बरसला. मात्र, पुढचे २ दिवस पाऊस विश्रांती घेईल, असा अंदाज आहे. यानंतर विदर्भातही पाऊस सक्रिय होईल, असा अंदाज आहे. पुढील ४ आठवड्यांच्या अंदाजानुसार, ८ ते १४ सप्टेंबर या कालावधीत कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भाग तसेच विदर्भाच्या काही भागांत पावसाची शक्यता आहे. १५ ते २१ सप्टेंबर या कालावधीत कोकण विभाग व विदर्भाच्या काही भागांत पाऊस पडू शकतो. २२ ते २८ सप्टेंबर आणि २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत सरासरीइतक्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील १५ दिवस पावसाची तूट बर्याच प्रमाणात भरून निघणार आहे.